Aaron Finch On IPL: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या आरोन फिंचचं आयपीएलबाबत मोठं वक्तव्य
आरोन फिंचनं आयपीएलच्या 2020 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळलं होतं.
Aaron Finch On IPL: बंगळुरू येथे नुकतेच आयपीएलचे दोन दिवसांचं मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शन दरम्यान अनेक फ्रँचायझींनी अनकॅप खेळाडूंवर पैशाचा पाऊस पाडलाय. तर, आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदान गाजवलेले क्रिकेटपटू अनसोल्ड ठरले आहेत. ही सर्वांना आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. या अनसोल्ड क्रिकेटपटूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार आरोन फिंच याचाही समावेश आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये कोणत्याही फ्रँचायझीनं त्याला खरेदी केलं नाही. याचपार्श्वभूमीवर आरोन फिंचनं आयपीएलबाबत मोठं वक्तव्य केलंय.
आरोन फिंचनं आयपीएलच्या 2020 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळलं होतं. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं त्याला रिलीज केलं. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्येही कोणत्याही संघानं त्याला खरेदी करण्यासाठी उस्तुकता दाखवली नाही. यानंतर आरोन फिंचनं ड्वेन्स वर्ल्ड शोमध्ये आयपीएलबाबत मोठ वक्तव्य केलंय. फिंच म्हणाला की, मला आयपीएलमध्ये खेळायला आवडतं. यात काही शंका नाही. मला आश्चर्य वाटले नाही. मला तिथे राहायला आवडले असते, कारण मी तिथे 10 वर्षे घालवली आहेत. त्यामुळे मी त्याबद्दल कृतज्ञ आहे." तसेच "पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावरील फलंदाजाजी मागणी अशी होती की, त्यांना आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी रिटेन केलं नाही", असंही त्यानं म्हटलंय.
फिंच व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडू अनसोल्ड ठरले. ज्यात लेग-स्पिनर अॅडम झाम्पा, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन, बेन मॅकडरमॉट, अँड्र्यू टाय, बेन द्वारशुईस, केन रिचर्डसन, मॉइसेस हेन्रिक्स आणि बेन कटिंग यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI 1st T20: भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस
- Happy Birthday AB de Villiers: एबी डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस; पदार्पणापासून तर, निवृत्तीपर्यंत कसा होता 'मिस्टर 360' चा प्रवास?
- Ranji Trophy Return : रणजी करंडक स्पर्धेला आजपासून प्रारंभ! पडद्यामागून केलेल्या प्रयत्ननामुळे हे शक्य झालं : जय शाह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha