IND Vs WI: अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी, बीसीसीआयचा मोठा निर्णय
IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती.
IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) खेळण्यात येणाऱ्या अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवागनी देण्यात आलीय. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल क्रिकेट असोसिएशननं बीसीसीआयकडं केली होती. त्यानंतर बीसीसीआयनं अखेरच्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्याच्या टी-20 मालिकेत प्रेक्षकांना परवागनी देण्यात यावी, अशी विनंती बंगाल असोसिएशननं पत्राद्वारे बीसीसीयकडं केली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या आरोग्याचा धोका पत्कारायचा नाही, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यातही प्रेक्षकांना परवागनी देण्यात आली नव्हती. मात्र, तिसऱ्या टी-20 सामन्यात 20 हजार प्रेक्षकांना परवानगी देण्याचा बीसीसीआयनं आज निर्णय घेतलाय.
बीसीसीआय अध्यक्ष काय म्हणाले?
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सीएबी प्रमुख अभिषेक दालमिया यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये असं म्हटलंय की, "प्रेक्षकांच्या परवानगीबाबत इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर बंगाल असोसिएशनची विनंती मान्य करण्यात आली आणि अखेरच्या टी-20 सामन्यात प्रेक्षकांना परवानगी देऊ शकता", असं म्हटलंय. यातील बहुतांश बंगाल क्रिकेट असोसिएशनचे तिकीटधारक सदस्यय आहेत.
अभिषेक दालमिया यांनी मानले बीसीसीआयचे आभार
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या टी-20 सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिल्यानं अभिषेक दालमिया यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत. " या निर्णयाबद्दल आम्ही बीसीसीआयचे खूप आभारी आहोत. मंडळाच्या या संमतीमुळं बंगाल क्रिकेट असोसिएशनला 20 फेब्रुवारीला होणाऱ्या टी-20 सामन्याद्वारे आजीवन सहयोगी, वार्षिक आणि मानद सदस्यांसाठी आपली जबाबदारी पूर्ण करता येईल".
भारत- वेस्ट इंडीज टी-20 मालिकेतील वेळापत्रक
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात 3 सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला 6 विकेट्सनं पराभूत करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 18 फेब्रुवारी आणि तिसरा सामना 20 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. हे सर्व सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होणार आहे.
हे देखील वाचा-
- IND vs WI 1st T20: भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात विक्रमांचा पाऊस
- Happy Birthday AB de Villiers: एबी डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस; पदार्पणापासून तर, निवृत्तीपर्यंत कसा होता 'मिस्टर 360' चा प्रवास?
- Ranji Trophy Return : रणजी करंडक स्पर्धेला आजपासून प्रारंभ! पडद्यामागून केलेल्या प्रयत्ननामुळे हे शक्य झालं : जय शाह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha