Prithvi Shaw IPL 2025: पृथ्वी शॉला बाहेर काढणे गरजेचे होते, कारण...; दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल काय म्हणाले?
Prithvi Shaw IPL 2025: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले.
Parth Jindal On Prithvi Shaw IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग 2025 साठीचा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयोजित करण्यात आला होता. या लिलावात सर्व 10 संघांसह 182 खेळाडूंसाठी एकूण 640 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या कालावधीत ऋषभ पंतला सर्वाधिक 27 कोटी रुपये मिळाले, तर श्रेयस अय्यरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. आयपीएलच्या या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) नावाचाही समावेश आहे.
आयपीएलच्या 2024 च्या हंगामात पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळत होता. शॉने 2024 च्या हंगामातील 8 सामन्यांमध्ये एकूण 198 धावा केल्या. मात्र यंदा आयपीएलच्या लिलावाआधी दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉला संघातून रिलीज केले होते. त्यामुळे पृथ्वी शॉला कोणता संघ खरेदी करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु पृथ्वी शॉला संघात घेण्यास कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. आता याबाबत दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ जिंदाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पार्थ जिंदाल पृथ्वी शॉबाबत काय म्हणाले?
झोपेतून जाग येण्यासाठी पृथ्वी शॉबाबत हा निर्णयाची गरज होती, जेणेकरून तो कठोर परिश्रम करेल आणि शिस्त लागेल. पृथ्वी शॉ चांगला मुलगा आहे, पण त्याला हा धक्का सहन करावा लागेल. तुम्ही सर्वात प्रतिभावान आहात, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशिवाय एमआरएफची बॅट असणारे तुम्ही जगातील एकमेव फलंदाज आहात. लोक तुला लारा म्हणतात, कोणी तुला सचिन म्हणतात, कोणी तुला पुढचा मोठा खेळाडू म्हणतात. अशा वातावरणात तू मोठा झालास...मात्र आता पृथ्वी शॉला अधिक मेहनत करण्याची गरज आहे, असं पार्थ जिंदाल यांनी स्पष्टपणे सांगितले.
पृथ्वी शॉची आयपीएलमधील कारकीर्द-
पृथ्वी शॉने आयपीएलमध्ये एकूण 79 आयपीएल सामन्यांमध्ये 23.95 च्या सरासरीने आणि 147.47 च्या स्ट्राइक रेटने 1892 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 14 अर्धशतकेही झळकावली आहेत. दरम्यान, 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या पृथ्वी शॉला त्याच वर्षी दिल्ली कॅपिटल्सने 1.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 2022 च्या लिलावात दिल्लीने पुन्हा पृथ्वी शॉला 7.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तेव्हापासून पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता.
संबंधित बातमी:
IPL 2025 मधील 10 संघांचे संभाव्य कर्णधार, RCB, CSK आणि KKR सह सर्व कर्णधारांची यादी