DY Patil T20 Cup : T20 मध्ये Prabhsimran Singh चा जलवा; 17 षटकारासह 161 धावांची धमाकेदार खेळी
Prabhsimran singh : प्रभसिमरन सिंहने धमाकेदार खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
Prabhsimran Singh Century In Dy Patil T20 Cup : एकिकडे टीम इंडिया (India) विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. तर दुसरीकडे मुंबईतील डीवाय पाटील टी 20 (DY Patil T20 Cup) स्पर्धा खेळवली जात आहे. कॅग (CAG) आणि इनकम टॅक्स (Income Tax) या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. या स्पर्धेत कॅगच्या प्रभसिमरन सिंहने धमाकेदार खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. प्रभसिमरन मैदानावर खेळायला येताच त्यानं मैदानात षटकारांचा पाऊसच पाडला. कॅगच्या वतीने फलंदाजी करताना त्याने इनकम टॅक्सच्या गोलंदाजांना आपल्या षटकारांनी पुरतं घायाळ केलं. दरम्यान प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) 'पंजाब किंग्स' (Punjab Kings) संघाकडून तो आयपीएलमध्ये (IPL) खेळतो.
प्रभसिमरन सिंहने 17 षटकार आणि 9 चौकार लगावत अवघ्या 55 चेंडूंमध्ये 161 धावांची खेळी केली. तर त्याच्या टीमनं 6 विकेट्स गमावत 267 धावा केल्या. तर प्रभसिमरन खेळत असलेल्या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या इनकम टॅक्सच्या संघानं 9 विकेट्स गमावत केवळ 152 धावा केल्या. दरम्यान, कॅगचा संघ 115 धावांनी विजयी झाला. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रभसिमरन सिंह आणि रामसिंह संजय कॅग संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आले होते.
Prabhsimran Singh scored 161 runs off 55 balls with 9 fours and 17 sixes in the DY Patil T20 Cup.
— Indian Domestic Cricket Forum - IDCF (@IDCForum) February 21, 2023
Dinesh Karthik also scored 75* off 38 balls including 5 fours & 6 sixes.#DYPatilT20Cup #DineshKarthik #PrabhsimranSingh #CricketTwitter pic.twitter.com/rRu0KnY7Gc
मैदानावर प्रभसिमरन नावाचं वादळ शेवटपर्यंत घोंगावत होतं. त्यानं अवघ्या 55 चेंडूत 161 धावा केल्या. त्याच्या 161 धावांच्या खेळीदरम्यान त्यानं 9 चौकार आणि 17 षटकार भिरकावले. त्याच्या या खेळीमुळे कॅगने इनकम टॅक्स संघाचा 115 धावांनी पराभव केला. दरम्यान, प्रभसिमरनने आर. संजयसोबत 117 धावांची भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर कॅगने 6 विकेस्ट गमावत 267 धावा केल्या.
'डीवाय पाटील टी 20' स्पर्धेबद्दल जाणून घ्या...
13 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीदरम्यान 'डीवाय पाटील टी 20' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आणि बीपीसीएल, बॅंक ऑफ बरोडा, सेंट्रल रेल्वे, टाटा अशा नामांकित टीमचादेखील या स्पर्धेत सहभाग आहे.
संबंधित बातम्या