Tata Group Inaugurate WPL 2023 : आयपीएलनंतर आता टाटाने WPL 2023 चे टायटल स्पॉन्सर विकत घेतले; BCCI सह 'इतक्या' वर्षांची डील
Women’s Premier League : WPL 2023 लीग 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यातंच आता, WPL ला टायटल स्पॉन्सर मिळालं आहे.
Women’s Premier League : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अनेक दिवसांपासून महिला प्रीमियर लीग (WPL) आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या महिला प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्या सीझनसाठी क्रिकेटप्रेमी फार उत्सुक आहेत. WPL 2023 लीग 4 मार्चपासून सुरू होणार आहे. यातंच आता क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. WPLला टायटल स्पॉन्सर मिळालं असून WPLचं टायटल टाटा उद्योग समूहाकडे (Tata Group) असणार आहे. दरम्यान, आयपीएलनंतर आता टाटाने महिला प्रीमियर लीगचेही टायटल हक्क विकत घेतले आहेत.
टाटा समूह भारतातील एक प्रसिद्ध व्यवसाय समूह आहे. काल म्हणजेच, (मंगळवारी 21 फेब्रुवारी रोजी) बीसीसीआय आणि टाटा यांच्या टायटल स्पॉन्सरशिपबाबत करार झाला. हा करार पाच वर्षांसाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.
टाटा उद्योग समूहाने गेल्या वर्षी आयपीएलचे हक्कही विकत घेतले होते. 2022 मध्ये, टाटा चीनी मोबाईल कंपनी Vivo च्या जागी IPL चे टायटल स्पॉन्सर झाले होते.
या संदर्भात BCCI चे सचिव जय शाह ट्विटरवर म्हणाले की,
I am delighted to announce the #TataGroup as the title sponsor of the inaugural #WPL. With their support, we're confident that we can take women's cricket to the next level. @BCCI @BCCIWomen @wplt20 pic.twitter.com/L05vXeDx1j
— Jay Shah (@JayShah) February 21, 2023
BCCI चे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर टाटा WPL टायटल स्पॉन्सर झाल्याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "मला याची घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की, टाटा समूह पहिल्या WPL चे टायटल स्पॉन्सर असेल. टाटा समूहाच्या पाठिंब्याने आम्ही महिला क्रिकेटला पुढच्या स्तरावर नेऊ शकतो. असा मला विश्वास आहे."
WPL 4 मार्चपासून सुरु होणार
WPL चा पहिला सीझन पुढील महिन्यात खेळला जाणार आहे. पहिला सामना 4 मार्चला तर अंतिम सामना 26 मार्चला होणार आहे. या करारात 87 खेळाडूंवर पाच संघांनी 59.50 कोटी रुपये खर्च केले. भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे, तिला आरसीबीने 3 कोटी 40 लाखांना विकत घेतलं आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने पाच संघांचे मालकी हक्क विकून तब्बल 4670 कोटी रुपये कमावले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :