(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे फेरबदल; रमीझ राजाची PCB मधून हकालपट्टी, नजम सेठी होऊ शकतात नवे अध्यक्ष
Ramiz Raja: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
Pakistan Government Decided To Remove PCB Chairman Ramiz Raja: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार, नजम सेठी पीसीबीचे नवे अध्यक्ष बनू शकतात. पाकिस्तानच्या नव्या सरकारने रमीझ राजा यांना पीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवले आहे.
पाकिस्तानात राजकीय अस्थिरता
माजी खेळाडू इम्रान खान सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय आंदोलने वाढली आहेत. आता शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. शाहबाज शरीफ यांचे सरकार रमीझ राजा यांना पीसीबी प्रमुख पदावरून हटवू शकते, असा अहवाल गेल्या महिन्यात आला होता. यानंतर आता त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
2017 मध्ये बिनविरोध निवडून आले होते नजम सेठी
नजम सेठी यांची आता पुन्हा पीसीबीच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते. 2017 मध्ये नजम सेठी यांची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. ज्यामध्ये त्यांनी त्या वेळी शहरयार खानच्या जागी हे पद स्वीकारले होते. मात्र इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर नजम सेठी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी एहसान मणी यांना अध्यक्ष करण्यात आले होते.
दरम्यान, इम्रान खान पंतप्रधान असताना पीसीबीच्या कार्यपद्धतीत बरेच बदल झाले होते, त्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण व्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित होते. पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटबाबत केलेल्या बदलांमध्ये पुन्हा काहीतरी नवीन पाहायला मिळू शकते.
हे देखील वाचा-