सर्वांचं आयपीएलकडे लक्ष असताना पाकिस्तानने घातला धुमाकूळ; न्यूझीलंडला 90 धावांत लोळवलं, अमिर, शाहीन चमकले!
Pakistan vs New Zealand T20: पाकिस्तानने (Pakistan) दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा (New Zealand) 7 गडी राखून पराभव केला.
Pakistan vs New Zealand: पाकिस्तानने (Pakistan) दुसऱ्या टी-20 मध्ये न्यूझीलंडचा (New Zealand) 7 गडी राखून पराभव केला. या दोघांमध्ये पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडीत खेळला गेला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शाहीन आफ्रिदीने संघासाठी सर्वाधिक 3 बळी घेतले, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 18.1 षटकांत 90 धावांत न्यूझीलंडला सर्वबाद केले. मार्क चॅम्पमनने संघासाठी 19 (16 चेंडू) धावांची सर्वात मोठी खेळी खेळली, ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. न्यूझीलंडचे एकूण 7 फलंदाज केवळ एक अंकी धावा करू शकले. यादरम्यान शाहीन आफ्रिदी व्यतिरिक्त, प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद आमिरनेही चांगली कामगिरी केली आणि 2 बळी घेतले. आमिरशिवाय अबरार अहमद आणि शादाब खान यांनाही प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.
पाकिस्तानचा 12.1 षटकांत विजय-
91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 12.1 षटकांत 3 गडी राखून विजय मिळवला. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर माघारी परतलेल्या सॅम अय्युबच्या (04) रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची (27 चेंडू) भागीदारी केली. बाबार 5 व्या षटकांत बाद झाला. बाबरने 13 चेंडूत 3 चौकारच्या मदतीने 14 धावा केल्या.
त्यानंतर उस्मान खानच्या रूपाने संघाने तिसरी विकेट गमावली, त्याला किवी फिरकी गोलंदाज ईश सोढीने त्रिफळाचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
मोहम्मद रिझवानने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले-
उस्मानने 6 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 7 धावा केल्या. यानंतर पाकिस्तानने एकही विकेट गमावली नाही. मोहम्मद रिझवान आणि इरफान खान यांनी चौथ्या विकेटसाठी 36 (30 चेंडू) धावांची भागीदारी केली आणि संघाला विजयाचा उंबरठा आणले. रिझवानने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावा केल्या. याशिवाय इरफान खानने 18 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारून 18 धावा केल्या.
पाकिस्तानचा संपूर्ण संघ:
बाबर आझम (c), मोहम्मद रिझवान (w), सैम अयुब, उस्मान खान, इफ्तिखार अहमद, इरफान खान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, अबरार अहमद, फखर जमान, इमाद वसीम, उसामा मीर , जमान खान, अब्बास आफ्रिदी
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ:
टिम सेफर्ट (w), टिम रॉबिन्सन, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मायकेल ब्रेसवेल (c), जोश क्लार्कसन, ईश सोढी, जेकब डफी, बेन सियर्स, बेन लिस्टर, विल्यम ओरोरके, टॉम ब्लंडेल, झॅकरी फॉल्केस, कोल मॅककॉन्ची
संबंधित बातम्या:
आजही विश्वचषकाच्या आठवणीत कोहली; गंभीरला भेटला अन् त्या विकेटबद्दल सर्वच सांगितलं, पाहा Video
विश्वचषक ते आयपीएल! निळ्या रंगाची जर्सी दिसताच ट्रेव्हिड हेड पेटून उठतो; रेकॉर्ड काय?, नक्की पाहा