On This Day: आजच्या दिवशी एकदिवसीय विश्वचषकात हॅट्रिक घेऊन मोहम्मद शामीनं रचला इतिहास
On This Day: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) उत्कृष्ट गोलंदाजी करून क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
On This Day: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं (Mohammed Shami) उत्कृष्ट गोलंदाजी करून क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. शामीनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. दरम्यान, 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यानं हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला. विश्वचषकात हॅट्रिक घेणारा मोहम्मद शामी चेतन चौहाननंतर दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय गोलंदाज ठरलाय. आजच्या दिवशी चार वर्षापूर्वी आफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्रिक घेऊन मोहम्मद शामीनं इतिहास रचला होता.
भारताकडून हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी चेतन चौहान हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय. त्यांनी 1987 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर पुढील हॅट्रिकसाठी भारतीय चाहत्यांना 32 वर्ष आणि सात विश्वचषकाची वाट पाहावी लागली. अखेर 2019 मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शामीनं हॅट्रीक घेतली.
अफगाणिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी
इंग्लंडमध्ये आयोजित 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघानं आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केलं होतं. तर, न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळं पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर पाचव्या सामन्यात भारताची गाठ अफगाणिस्तानविरुद्ध पडली होती. याच सामन्यात मोहम्मद शामीनं आपल्या भेदक गोलंदाजीनं चमत्कार केला होता.
दिग्गजांच्या पंक्तीत स्थान
विश्वचषकात हॅट्रीक घेऊन मोहम्मद शामीनं सकलेन मुश्ताक, चामिंडा वास, ब्रेट ली, लसिथ मलिंगा, केमार रोच, स्टीव्हन फिन आणि जेपी ड्युमिनी यांच्या पंक्तीत स्थान मिळवलं. विश्वचषकात मोहम्मद शामीनं केलेल्या दमदार कामगिरीमुळं त्याच्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला होता.
हे देखील वाचा-