ENG vs IND: भारताविरुद्ध कसोटीपूर्वी इंग्लंडला धक्का! कर्णधार स्टोक्स संघाबाहेर होण्याची शक्यता
IND vs ENG: इंग्लंड क्रिकेट संघाला 1 जुलै-5 जुलै दरम्यान टीम इंडियाविरुद्ध (England vs India) त्यांच्याच घराच्या मैदानावर कसोटी सामना खेळायचा आहे.
IND vs ENG: इंग्लंड क्रिकेट संघाला 1 जुलै-5 जुलै दरम्यान टीम इंडियाविरुद्ध (England vs India) त्यांच्याच घराच्या मैदानावर कसोटी सामना खेळायचा आहे. बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर (Edgbaston Cricket Ground) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. कर्णधार बेन स्टोक्सची तब्येत बिघडली असून तो या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
सराव सत्रात बेन स्टोक्सनं गैरहजर
दरम्यान, इंग्लंड संघाला 23 जुलैपासून लीड्समध्ये न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना खेळायचा आहे. यासाठी इंग्लंडचा संघ जोरदार सराव करत आहे. परंतु, सराव सत्रादरम्यान बेन स्टोक्सनं संघासोबत सराव करताना दिसला नाही.
बेन स्टोक्सची तब्येत बिघडली
इंग्लंडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेन स्टोक्सची तब्येत बिघडली आहे. अशा स्थितीत इंग्लंड संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना कर्णधाराशिवाय खेळावा लागणार असल्याचं मानलं जातंय. तसेच, बेन स्टोक्स टीम इंडियाविरुद्ध कसोटी सामना खेळू शकेल की नाही? हे अद्याप ठरलेलं नाही.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटीमालिकेत इंग्लंड 2-0 नं आघाडीवर
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत बेन स्टोक्स तिसरी कसोटी खेळला नाही तरी संघावर कोणताही परिणाम होणार नाही.
स्टोक्सकडं जवळपास 9 दिवसांचा वेळ
भारत आणि इंग्लंड यांच्यातील रिशेड्युल कसोटी सामना 1 जुलैपासून खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत स्टोक्सकडे आता जवळपास 9 दिवसांचा वेळ आहे. सध्या बेन स्टोक्सला कोरोना झाला आहे की नाही? याची पुष्टी झालेली नाही. त्याचा पूर्वीचा कोविड अहवाल निगेटिव्ह आला होता.
हे देखील वाचा-
- India tour of England : भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी सज्ज, सराव सुरु, बीसीसीआयने शेअर केला VIDEO
- Shabaash Mithu Trailer : ‘शाबास मिथू’ च्या ट्रेलरचं दिग्गजांकडून कौतुक, सचिन-सौरव म्हणाले...
- Hardik Pandya : पांड्याची फिल्ड प्लेसमेंट करण्याची कला जबरदस्त, हार्दिकच्या नेतृत्त्वाचा फॅन झाला मोहम्मद कैफ