ENG vs IND: बर्मिंगहॅम कसोटीत रविचंद्रन अश्विन खेळणार की नाही? मोठी अपडेट्स समोर
Ravichandran Ashwin: इंग्लंडविरुद्ध रिशेड्युल कसोटी सामना खेळण्यासाठी भारतातील बहुतेक खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत.
Ravichandran Ashwin: इंग्लंडविरुद्ध रिशेड्युल कसोटी सामना खेळण्यासाठी भारतातील बहुतेक खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. मात्र, या सामन्यापूर्वीच भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर गेला नाही. यानंतर अश्विन इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. यातच रविचंद्रन अश्विनच्या इंग्लंड दौऱ्याबाबत महत्वाची माहिती समोर आलीय.
भारताचा सराव सामना कधी?
भारतीय संघ 24 जूनपासून सराव सामना खेळणार आहे. अश्विन येत्या काही दिवसांत इंग्लंडला येणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातंय. याशिवाय कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे आणि अश्विन सराव सामन्यात सहभागी होणार असल्याचंही समजत आहे.
अश्विनच्या प्रकृतीत सातत्यानं सुधारणा
अश्विनच्या प्रकृतीत सातत्यानं सुधारणा होत असल्याचा दावा बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्यानं केला जातोय. येत्या 24 तासांत रवी अश्विन इंग्लंडला रवाना होऊ शकतो, असंही बोललं जात आहे. अश्विनच्या प्रकृतीत वेळत सुधारणा न झाल्यास जयंत यादवला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
अश्विनची कसोटी कारकीर्द
कसोटी क्रिकेटमध्ये रविचंद्रन अश्विननं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. त्यानं आतापर्यंत 86 कसोटी सामन्यात 442 विकेट घेतल्या आहेत. आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघ एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पाचवी कसोटी खेळणार आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 नं आघाडीवर आहे आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून इतिहास रचण्यासाठी सज्ज झालाय.
हे देखील वाचा-