(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kohli ODI Century : सचिनला अभिवादन, अनुष्काला फ्लाईंग किस, शतकाच्या अर्धशतकानंतर कोहलीचे विराट सेलिब्रेशन
रनमशीन विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर वनडे क्रिकेटमधील शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीने 106 चेंडूमध्ये शतकाला गवसणी घातली.
Virat Kohli ODI Century : रनमशीन विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर वनडे क्रिकेटमधील शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीने 106 चेंडूमध्ये शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या साक्षीने नवा इतिहास रचला. विराट कोहलीने सचिनच्या समोरच वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. तेही सचिनपेक्षा कमी डावात त्याने हा पराक्रम केलाय. विराट कोहलीनेही सचिनच्या शतकांचा विक्रम मोडल्यानंतर मास्टर ब्लास्टरला मैदानातच अभिवादन केले. तर पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिली. विराट कोहलीचे शतकानंतरचं सेलिब्रेशन सध्या जोरदार चर्चेत आहे.
विराट कोहली याने 50 वे शतक ठोकताच निश्वा:स सोडला. 50 व्या शतकांचे प्रेशर विराट कोहलीवर प्रचंड असे होते. पण आता तो फ्रीमध्ये फलंदाजी करेल, असाच सर्वांना अंदाज आहे. विराट कोहलीने दुहेरी धाव घेत सचिनच्या शतकांचा विक्रम मोडला. त्यानंतर धावत जात सचिन तेंडुलकरला अभिवादन केले. सचिन तेंडुलकर उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी मैदानात आला होता. विराट कोहलीने त्याच्याकडे पाहत अभिवादन केले.
Virat Kohli bowing down to Sachin Tendulkar after reaching his 50th century.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
Moment of the day! pic.twitter.com/RH8QXtLwmt
Virat Kohli bowling down to Sachin Tendulkar. pic.twitter.com/ThiOjopH67
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
अनुष्का शर्मा प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर येत असते. आजही वानखेडेवर अनुष्काने उपस्थिती लावली होती. विराट कोहलीने शतक पूर्ण केल्यानंतर पत्नी अनुष्काला फ्लाईंग किस देत आपला आनंद द्विगुणित केला. विराट कोहलीच्या शतकानंतर अनुष्का शर्मानेही टाळ्या वाजत त्याचे अभिनंदन केले.
This is so special....!!! pic.twitter.com/eqfOrT7Dng
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
विराट कोहलीचे जिगरबाज शतक -
रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने भारातची धावसंख्या वाढवली. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत आधी मोठी भागिदारी केली. गिल क्रॅम्प आल्यामुळे मैदानाबाहेर गेला. पण त्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत 93 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अय्यरसोबत त्याने 128 चेंडूत झटपट 163 धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि अय्यर यांनी भारताची धावगती वाढण्याचे काम केले. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.
David Beckham, Akash Ambani and Kiara Advani applauding the greatness of King Kohli. pic.twitter.com/z6RtU8d0q1
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023