(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shikhar Dhawan : 2023 चा एकदिवसीय विश्वचषक खेळणं माझं ध्येय, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी शिखरनं केलं स्पष्ट
IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका उद्यापासून अर्थात 6 ऑक्टोबरपासून सुरु होत असून शिखर धवन संघाचा कर्णधार असणार आहे.
Shikhar Dhawan : भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बरीच वर्षे चांगली कामगिरी करत आहे. मात्र, असे असतानाही बराच काळ त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळायला मिळालं नसून आता तो टी20 संघातही नसतो. युवा खेळाडूंमुळे त्याची जागा बाजूला झाली आहे. पण आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखरला कर्णधार म्हणून संघात स्थान मिळालं आहे. टी20 विश्वचषकासाठी दिग्गज खेळाडू या मालिकेत नसून रोहितही त्यामुळे विश्रांतीवर आहे. अशामध्ये पुन्हा एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरणाऱ्या शिखरनं सामन्यापूर्वीच 'माझ ध्येय चांगली कामगिरी करुन आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी स्वत:ला फिट ठेवण्याचे आहेत,' असं शिखर म्हणाला.
धवन म्हणाला, "मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, माझी कारकीर्द इतकी अप्रतिम राहिली. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझा अनुभव युवा खेळाडूंसोबत शेअर करतो. आता माझ्याकडे नवीन जबाबदारी आहे पण मी प्रत्येक आव्हान संधी म्हणून स्वीकारतो. 2023 मध्ये होणारा क्रिकेट विश्वचषक हे माझं लक्ष्य आहे. त्यासाठी मला स्वत:ला फिट ठेवायचं आहे आणि स्वत:ला मानसिकदृष्ट्याही मजबूत ठेवायचं आहे." 36 वर्षीय धवन गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतासाठी शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याला ही संधी तेव्हा मिळाली जेव्हा संघातील बहुतेक वरिष्ठ खेळाडू होते. इंग्लंड दौऱ्यावर आणि भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौऱ्यावरही खेळत होता. धवनने 2018 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं वेळापत्रक आणि संघ
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 6 ऑक्टोबर 2022 | लखनौ |
दुसरा एकदिवसीय सामना | 9 ऑक्टोबर 2022 | रांची |
तिसरा एकदिवसीय सामना | 11 ऑक्टोबर 2022 | दिल्ली |
हे देखील वाचा-