MS Dhoni News: उद्या कोणतातरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत धोनी, सोशल मीडियावर केली खास घोषणा
MS Dhoni Social Media Post : माजी भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत उद्या म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी काहीतरी खास बातमी सर्वांसोबत शेअर करणार असल्याची माहिती दिली आहे.
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) म्हणजेच भारतीय क्रिकेटमधीलच नाही तर जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या कर्णधारांपैकी एक म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण धोनी आयसीसीच्या तिन्ही मानाच्या ट्रॉफी (ICC Trophy) जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आजही धोनीचे कोट्यवधी चाहते आहेत, अशात आता धोनी उद्या अर्थात 25 सप्टेंबर रोजी काहीतरी खास बातमी सर्वांसोबत शेअर करणार असल्याची माहिती, त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. धोनी नेमका कोणता निर्णय घेणार ही सर्वांसाठीच उत्सुकतेची बातमी आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टवर बऱ्याच कमेंट्स येत आहेत.
15 ऑगस्ट, 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. 2019 मध्ये विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारत पराभूत झाला, ज्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय सामना खेळलाच नाही. धोनीने न्यूझीलंडविरुद्ध भारताला सामना जिंकवून देण्यासाठी मेहनत घेतली. पण अखेर तो धावचित झाला आणि त्याचे प्रयत्न निष्फळ झालेच तसंच अनेक भारतीयांची मनंही तुटली. त्यानंतर धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाचं नेतृत्त्व करत आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात. त्यात आता धोनी नेमका कोणता निर्णय घेणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे. आयपीएलसंबधी कोणती घोषणा असेल का? अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
काय आहे धोनीची पोस्ट?
एमएस धोनीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, "मी तुमच्यासोबत एक बातमी शेअर करणार आहे. मी 25 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता लाईव्ह येऊन नेमकी माहिती देईन. आशा आहे की तुम्ही सर्व तिथे असाल."
धोनीची FB पोस्ट-
धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केलं आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-