IPL 2023 : 'माही मार रहा है', चेन्नईच्या प्रशिक्षण शिबिरात धोनीनं केला चौकार-षटकारांचा वर्षाव, पाहा VIDEO
MS Dhoni VIDEO : आयपीएल 2023 पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जोरदार तयारी करत आहे. धोनी सराव करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
MS Dhoni in Chennai for IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premiere League) अर्थात आयपीएलच्या (IPL) तयारीसाठी भारतीय स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपरकिंग्स संघाचा (Chennai Super Kings) कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो चेन्नईमध्ये (Chennai) दाखल झाला ज्यानंतर आता तो जोरदार सराव करताना दिसून आला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होणार आहे, ज्यामध्ये पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. खासकरुन चाहत्यांचा लाडका आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आगामी आयपीएल हंगामासाठी विशेष तयारी करत आहे. या तयारीदरम्यान त्याने CSK प्रशिक्षण शिबिरात फलंदाजी करताना भरपूर चौकार आणि षटकार मारले. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन धोनीच्या फलंदाजीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO-
Thala Update!
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 9, 2023
⏳: 1️⃣9️⃣ : 2️⃣9️⃣#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/lr5a1c3E6i
धोनीनं केला चौकार आणि षटकारांचा वर्षाव
चेन्नई सुपर किंग्सने गुरुवारी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन महेंद्र सिंग धोनीच्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानाच्या चारही बाजूंनी लांब षटकार मारताना दिसत आहे. आयपीएल 2023 पूर्वी धोनीच्या बॅटमधून हे षटकार बाहेर पडताना पाहून चाहते देखील खूप आनंदी होत आहेत. सरावाप्रमाणेच आयपीएलमध्येही धोनीची बॅट जबरदस्त बोलेल, अशी चाहत्यांना आशा आहे. धोनीची तयारी पाहून महेंद्रसिंग धोनी यंदा चाहत्यांची ही इच्छा नक्कीच पूर्ण करेल असं वाटत आहे.
धोनी घेऊ शकतो आयपीएलमधूनही निवृत्ती
महेंद्र सिंग धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता असं मानलं जात आहे की 2023 मध्ये आयपीएलची 16 वी आवृत्ती त्याची शेवटची असेल, त्यानंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होईल. चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याला आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायला आवडेल, असं धोनीने आपल्या आधीच्या वक्तव्यात स्पष्ट केलं होतं. अशा परिस्थितीत या मोसमानंतर तो क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगला अलविदा करेल अशी शक्यता आहे. मात्र धोनीकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
हे देखील वाचा-