एक्स्प्लोर

Ranji Trophy Final : मुंबईचं 42 व्या जेतेपदाचं स्वप्न भंगलं; मध्य प्रदेशचा सहा विकेट्सनं विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर

Madhya Pradesh won Ranji : भारतीय क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश संघाने विजय मिळवत मुंबईचं 42 व्या विजयाचं स्वप्न भंग केलं आहे.

MP vs MUM Ranji Trophy 2022 Final : तब्बल 41 वेळा रणजी ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई संघाचं यंदा रणजी जिंकण्याचं स्वप्न मध्य प्रदेश संघानं धुळीस मिळवलं आहे. अंतिम सामन्यात सहा विकेट्सने मात देत एमपीने रणजी चषक नावे केला आहे. मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनलमध्ये नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाला खास फलंदाजी करता न आल्याने ते 269 धावांवर सर्वबाद झाले. ज्यानंतर 108 धावांच लक्ष्य मध्य प्रदेश संघाने दुसऱ्या डावात 4 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि चषक नावे केला आहे. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...

MP vs MUM 10 महत्त्वाचे मुद्दे-

  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकल्यावर हवा तो निर्णय घेऊन प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येते आणि विजय मिळवणं सोपं होतं. पण या सामन्यात मात्र मुंबईने नाणेफेक जिंकूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये खास कसब दाखवता आला नाही.
  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना दोघांनाही खास कामगिरी करता आली नाही. दुसरीकडे मात्र मध्यप्रदेश संघाच्या फलंदाजांनीच नाही तर गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत 6 विकेट्सनी सामना जिंकला. 
  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात ठिकठाक झाली.
  4. दोन्ही सलामीवीरांनी उत्तम फलंदाजी केली. पण 47 धावा करुन पृथ्वी बाद झाला. यशस्वीकडून चांगला खेळ सुरुच होता, पण त्याला हवी सोबत मिळत नव्हती. अखेर यशस्वीही 78 धावा करुन बाद झाला.
  5. इतर खेळाडूंना खास कामगिरी करता येत नव्हती अशात अनुभवी सरफराज खानने मात्र दमदार शतक ठोकत 134 धावा केल्या, ज्याच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 374 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
  6. त्यानंतर प्रत्युत्तरात मध्य प्रदेशच्या संघानं अफलातून फलंदाजी करत 536 धावा केल्या यावेळी एमपीच्या तीन फलंदाजांना शतकं ठोकली. यात यश दुबेने 133, शुभम शर्मा 116 आणि रजत पाटीदारने 122 धावा केल्या. सारांश जैननेही 57 धावा केल्यामुळे 536 धावांच्या मदतीने मध्य प्रदेशने 162 धावांची आघाडी घेतली.
  7. दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना खास कामगिरी करता आली नाही. केवळ सुवेद पारकरने 51 धावा करत अर्धशतक केलं. तर पृथ्वीने 44 आणि सरफराजने 45 धावा केल्या इतर सर्व फलंदाज फेल झाले. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले आणि 269 धावांवर मुंबईचा डाव आटोपला ज्यामुळे 108 धावांचे सोपे लक्ष्य मध्य प्रदेशला मिळालं.
  8. 108 धावांचे माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या मध्य प्रदेश संघाने 4 विकेट्स गमावल्या पण रजत पाटीदारच्या नाबाद 30 धावांमुळे संघाने 29.5 षटकातचं विजय नावे केला. यावेळी शुभम शर्मानेही 30 तर हिमांशू मंत्रीने 37 धावा केल्या.
  9. यासोबतच 6 विकेट्श हातात ठेवत मध्य प्रदेश संघाने दमदार असा विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
  10. सामनावीर म्हणून शुभम शर्मा तर मालिकावीर म्हणून सरफराज खानला पुरस्कृत करण्यात आलं.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले
Sanjay Raut On BMC Election : ठाकरे बंधूंच्या अपयशानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget