ENG vs IND: शामीचा वेग, जाडेजाच्या फिरकीनं वेधलं लक्ष; इग्लंडच्या संघासमोर मोठं आव्हान!
England vs India: भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून रिशेड्युल केलेला एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. सध्या भारतीय संघ लिसेस्टशायर यांच्याशी सराव सामना खेळत आहे.
England vs India: भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलैपासून रिशेड्युल केलेला एकमेव कसोटी सामना खेळला जाणार आहे. सध्या भारतीय संघ लिसेस्टशायर यांच्याशी सराव सामना खेळत आहे. यासामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी आणि रवींद्र जाडेजानं उत्कृष्ट कामगिरी करून दाखवलीय. सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शामी-जाडेजाच्या जोडीनं भेदक गोलंदाजी करत लिसेस्टशायर संघाचं कंबरडं मोडलं. लिसेस्टशायरच्या पहिल्या डावात दोघांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामुळं बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात इंग्लंडसमोर शामी- जाडेजाच्या जोडीचं मोठं आव्हान असणार आहे.
लिसेस्टशायरविरुद्ध सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कहर केलाय. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं लिसेस्टशायरचा संघ 244 धावांवर ढेपाळला. मोहम्मद शामी आणि रवींद्र जाडेजा व्यतिरिक्त शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या आहेत. हे भारतीय संघासाठी चांगले संकेत मानले जात आहेत.
भारतीय गोलंदाजांचं प्रदर्शन
मोहम्मद शामी- तीन विकेट्स (12 षटक, 42 धावा दिल्या)
रवींद्र जाडेजा- तीन विकेट्स (8 षटक, 28 धावा दिल्या)
मोहम्मद सिराज- दोन विकेट्स (11 षटक, 46 धावा दिल्या)
शार्दुल ठाकूर- दोन विकेट्स (16 षटक 71 धावा दिल्या)
भारताची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात
भारतीय संघाने दुसऱ्या डावात केएस भरतला सलामीवीर म्हणून पाठवलं. भारतनं शुभमन गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. गिल 38 धावा करून नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर आऊट झाला. केएस भरत (31) आणि हनुमा विहारी (9) नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 80 धावा केल्या आहेत.
नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 246 धावांवर पहिला डाव घोषित केला.भारतातून एस. भरतनं सर्वाधिक 70 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय विराट कोहलीनं 33 आणि कर्णधार रोहित शर्माने 25 धावा केल्या.
हे देखील वाचा-