एक्स्प्लोर

Mohammed Siraj : सिराजने बालपणीच्या मित्राला भेट दिला आयफोन आणि जी शॉकचं घड्याळ, मित्रानेही अभिमानाने कॅमेऱ्यासमोर दाखवलं गिफ्ट

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला एकदिवसीय सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला गेला, या सामन्यावेळी सिराजचे कुटुंबीय आणि मित्रही उपस्थित होते.

Siraj Gifts iPhone To Friend : हैदराबादचा लोकल बॉय असणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आज भारतीय क्रिकेट संघात हवा करताना दिसत आहे. एका सामान्य रिक्षावाल्याचा मुलगा असणारा सिराज आज आघाडीचा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानात झालेल्या बुधवारच्या (18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सिराजने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्रही सामना पाहण्यासाठी उपस्थित होते, ज्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता सर्वच फार आनंदी दिसत होते. यावेळी सिराजचा जवळचा मित्र मोहम्मद शफी हा देखील तिथे होता. त्याला सिराजने आयफोन आणि जी शॉकचं घड्याळ भेट म्हणून दिलं होतं, जे त्यानं अगदी आवर्जून कॅमेऱ्यासमोर दाखत हे माझ्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं.

सिराजने दिलेलं गिफ्ट जपून ठेवलंय : मोहम्मद शफी

सिराज आणि शफीबद्दल सांगताना सिराजची आई म्हणाली, “सिराज आणि शफी नेहमीच एकत्र राहायचे. बालपणीचे मित्र आहेत," यानंतर शफी म्हणाला “हा पाहा आयफोन सिराजने भेट दिला आहे आणि हे स्मार्टवॉच देखील तसंच आणखी एक जी-शॉकचं घड्याळ आहे जे त्याने माझ्या वाढदिवशी मला दिले, मी ते जपून ठेवले आहे. कारण ते खूपच महाग आहे,” असं शफीने सिराजबद्दल बोलताना सांगितलं.  

सिराजने विश्वचषकही खेळावा, आईची इच्छा

बुधवारच्या सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 349 धावांचा डोंगर उभा केला. शुभमन गिल याने 208 धावांची तुफान खेळी खेळल्यामुळे भारताने हे मोठं लक्ष्य उभारलं. पण न्यूझीलंडनही कडवी झुंज दिली. 337 रन त्यांनी केले पण 12 धावा कमी पडल्याने भारत जिंकला. यावेळी गोलंदाजीत भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. सिराजने 10 षटकांत 46 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. त्याने यावेळी दोन मेडन ओव्हर्सही टाकल्या. दरम्यान सिराजची ही कमाल गोलंदाजी पाहून तो आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात अशी आशा आहे. दरम्यान या सामन्यातील त्याची कामगिरी पाहून सिराजची आई म्हणाली, ''अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी त्याची कामगिरी आहे. त्याची कामगिरी आणखी चांगली होवो आणि तो पुढे जाऊन त्याने विश्वचषकही खेळावा.” 

भारताची पुढची लढत रायपूरमध्ये

भारतीय संघ शनिवार अर्थात 21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आपला पुढचा वनडे सामना खेळणार आहे. हा सामना शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होणार असून भारत जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 May 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 20 May 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
Embed widget