(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : निर्णायक कसोटीत भारतीय संघ करु शकतो अंतिम 11 मध्ये महत्त्वाचा बदल, शमीचं पुनरागमन निश्चित
IND vs AUS : इंदूर कसोटीत 9 विकेट्सनी सामना गमवावा लागल्याने भारत WTC फायनलमध्ये अद्याप पोहचू शकलेला नाही, त्यामुळे चौथी कसोटी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने यावेळा अंतिम 11 मध्ये बदल निश्चित आहे.
Mohammed Shami : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे संघात पुनरागमन निश्चित मानलं जात आहे. इंदूरमधील दारुण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकतो.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मोहम्मद शमी अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लक्षात घेऊन टीम इंडियाचा चौथा टेस्ट मॅच 'करा किंवा मरो'चा असेल. हा सामना जिंकूनच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकते. भारतीय संघ चौथा सामनाही हरला तर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या निकालावर संघाला अवलंबून राहावे लागेल. या दोघांमध्ये होणार्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.
शमी दुसऱ्या कसोटीत का खेळला नाही?
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी टीम इंडियाचा भाग नव्हता. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. नागपूर आणि दिल्ली येथे झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शमी टीम इंडियाचा भाग होता. कसोटीनंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद शमीचाही संघात समावेश आहे, त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली असून उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.
फलंदाजीच्या सरावाचा फोटो केला शेअर
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी शमीने त्याच्या सोशल मीडियावर (Shami Social Media) एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. शमी नेटमध्ये दिसत आहे. त्याने हातात पॅड, थाई पॅड आणि हातमोजे घातले आहेत. यावेळी तो हेल्मेट नव्हे तर टोपी घातलेला दिसला. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "पुढे येऊन चार्ज करण्याची संधी कधीही सोडू नका."
पाहा PHOTO-
Never miss an opportunity to step out and charge #mdshami11 #mdshami #redball #indiavsaus #practice pic.twitter.com/Oo0hGDAchb
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) March 4, 2023
बॉर्डर गावस्कर मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत (BGT 2023) टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला चौथा सामना जिंकावा लागेल किंवा बरोबरीत सोडवावा लागेल. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. भारतीय संघ चौथी कसोटी हरला तर श्रीलंका आणि न्यूझीलंड (SL vs NZ) यांच्यातील कसोटीच्या निकालावर संघाला अवलंबून राहावे लागेल.
हे देखील वाचा-