एक्स्प्लोर

LLC 2022 : आज भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स आमने-सामने, हरभजन, इरफानसह दिग्गज उतरणार मैदानात

LLC : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आज भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स हे दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

LLC 2022, Manipal Tigers vs Bhilwara Kings : लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील सामने अगदी धमाल होताना दिसत आहेत. आजही रविवारी (18 सप्टेंबर) भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स हे संघ आमने सामने असणार आहेत. त्यात शनिवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सकडून केविन ओब्रायनने दमदार शतक ठोकत इंडिया कॅपिटल्सला तीन विकेट्सनी मात दिली. आज आमने-सामने येणाऱ्या संघातही दिग्गज खेळाडू मैदानात येणार आहेत. यावेळी भिलवाडा किंग्सचा कर्णधार इरफान पठाण तर मणिपाल टायगर्सचं नेतृत्त्व हरभजन सिंह करणार आहे.

कधी, कुठं पाहायचा सामना?

लीजेंड्स लीग क्रिकेटचे आजचा सामना (18 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. 

कसे आहे दोन्ही संघ?

भिलवाडा किंग्स: इरफान पठाण (कर्णधार), ओवश शाह, शेन वॉटसन, मॉन्टी पानेसर, मॅट प्रायर, श्रीसंथ, नमन ओझा, मयंक तेहलान, तन्मय श्रीवास्तव, समित पटेल, टिम ब्रेसनन, निक कॉम्पटन, टिनो बेस्ट, फिदेल एडवर्ड्स, विलियम पोटरफिल्ड, दिनेश साळुंके, सुदीप त्यागी.

मणिपाल टायगर्स: हरभजन सिंह (कर्णधार), रोमेश कालुवितार्णा, लांस क्लूजनर, रियान साइडबॉटम, ब्रेट ली, रतिंदर सोढी, मोहम्मद कैफ, रिकार्डो पॉवेल, शिवकांत शुक्ला, दिलहारा फर्नांडो, स्वप्निल असनोदकर, इमरान ताहिर, डेरेन सॅमी, विक्रम सिंह, क्रिस मोफू, कोरी अँडरसन, परविंदर अवाना.

5 ऑक्टोबरला रंगणार फायनल

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला आहे. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं आहेत. ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळतील. म्हणजेच प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले जातील. लीगचा अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणारCNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget