IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यांवर संकट, स्टेडियमनं 2 कोटींहून अधिकचं वीजबिल थकवलं
Team India : टी20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी20 सामने खेळणार आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेसोबत भारत तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
![IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यांवर संकट, स्टेडियमनं 2 कोटींहून अधिकचं वीजबिल थकवलं Team India vs South Africa T20 matches are in danger electricity issue in Greenfield International Stadium Thiruvananthapuram IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यांवर संकट, स्टेडियमनं 2 कोटींहून अधिकचं वीजबिल थकवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/21/5776887543a76d71bf1bfb714114ac20_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs SA, T20 Series : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेपूर्वी (ICC T20 World Cup) भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामना खेळणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियासोबत टी20 सामन्यानंतर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळेल. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यावर आता संकट उभं राहिलं आहे. सामना होणाऱ्या तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमने (Greenfield International Stadium Thiruvananthapuram) केरळ राज्य विद्युत मंडळ अर्थात केएसईबीचं वीजबिल थकवल्यामुळे सामन्यादरम्यान वीजेचा प्रश्न उभा राहू शकतो.
भव्य ग्रीनफील्ड स्टेडियम भारत विरुद्ध पहिल्या T20 क्रिकेट सामन्यासाठी सज्ज झाले आहे. पण केरळ राज्य विद्युत मंडळाने (KSEB) बिल न भरल्यामुळे मैदानाचा वीजपुरवठाच खंडित केला आहे. केएसईबीचं तब्बल 2.50 कोटी रुपयांचं वीजबिल थकित असल्याचं यावेळी समोर आलं आहे. विशेष म्हणजे केरळ जल प्राधिकरणही पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी मैदानत प्रशासनाला दिली आहे. या सर्वामागील कारण म्हटलं तर, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्टेडियम मालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सर्वाला कोरोना महामारीही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 2 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबरला खेळला जाईल. यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल, जी 11 ऑक्टोबरपर्यंत खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी.
वरील संघातील मोहम्मद शमी हा सध्या कोरोनाबाधित आढळल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांना अजून काही दिवस शिल्लक असून तोवर तो फिट झाल्यास खेळू शकतो.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)