![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Legends League Cricket : गुजरात जायंट्सचा इंडिया कॅपिटल्सवर विजय, केविन ओब्रायनचं दमदार शतक
LLC 2022 : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गुजरात जायंट्स संघाने केविन ओब्रायनच्या शतकाच्या जोरावर इंडिया कॅपिटल्स संघाला तीन विकेट्सनी मात दिली आहे.
![Legends League Cricket : गुजरात जायंट्सचा इंडिया कॅपिटल्सवर विजय, केविन ओब्रायनचं दमदार शतक Legends League Cricket Gujrat Giants beat India capitals with 3 wickets remaining Legends League Cricket : गुजरात जायंट्सचा इंडिया कॅपिटल्सवर विजय, केविन ओब्रायनचं दमदार शतक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/bf8acef0dec48f8af6d7904a379541111663438580266323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
LLC 2022, India capitals vs Gujrat Giants : लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket 2022) स्पर्धेत कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर इंडिया कॅपिटल्स (India Capitals) आणि गुजरात जायंट्स (Gujrat Giants) या दोन संघात सामना पार पडला. यावेळी वीरेंद्र सेहवाग कर्णधार असणाऱ्या गुजरात जायंट्सने इंडिया कॅपिटल्सला 3 गडी राखून पराभूत केलं. गुजरात जायंट्ससाठी, आयर्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन ओब्रायनने 61 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 107 धावांची शानदार शतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना इंडिया कॅपिटल्सने 179 धावा केल्या. इंडिया कॅपिटल्सकडून एश्ले नर्सने शानदार 103 धावा करत शतक ठोकलं होतं. पण केविनच्या शतकाच्या जोरावर गुजरात जायंट्सने इंडिया कॅपिटल्सला मात दिली.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेकीनंतर गुजरात जायंट्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंडिया कॅपिटल्स संघाने हॅमिल्टन मसाकादझाच्या (7) रूपात 19 धावांवर पहिला विकेट गमावला. त्यानंततर फलंदाजीला आलेला कर्णधार जॅक कॅलिस खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी इंडिया कॅपिटल्सचा दुसरा सलामीवीर सोलोमन मायरलाही केवळ 9 धावा करता आल्या. इंडिया कॅपिटल्सला चौथा धक्का सुहेल शर्माच्या रूपाने बसला, तोही खाते न उघडता बाद झाला. त्याचवेळी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिन आणि ऍशले नर्सने डावाची धुरा सांभाळली. मात्र थिसारा परेराच्या चेंडूवर दिनेश रामदिन (31) बाद झाला. त्याचवेळी यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रजत भाटियाला खातेही उघडता आले नाही आणि तो शून्य धावांवर बाद झाला. इंडिया कॅपिटल्ससाठी ऍशले नर्सने 43 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 103 धावांचे शानदार शतक झळकावले. ज्यामुळे संघाने 180 धावांचं लक्ष्य गुजरात जायंट्ससमोर ठेवलं.
केविनचं शतक गुजरात जायंट्सचा विजय
180 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची सुरुवात चांगली झाली. पण 40 धावांवर त्यांनी आपली विकेट गमावली. या सामन्यात वीरेंद्र सेहवागची बॅट चालू शकली नाही आणि तो अवघ्या 6 धावा करून मिचेल जॉन्सनचा बळी ठरला. यानंतर केविन ओब्रायन आणि पार्थिव पटेल यांनी डावाची धुरा सांभाळत संघाची धावसंख्या 100 च्या पुढे नेली. पण संघाने 110 धावा केल्या, पार्थिव पटेल (24) अॅश्ले नर्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, गुजरात जायंट्ससाठी केविन ओब्रायनने 61 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 107 धावांचं मॅचविनिंग शतक झळकावलं. ज्यामुळे गुजरात जायंट्सने 3 गडी राखून सामना जिंकला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)