Coronavirus : केएल राहुलला कोरोनाची लागण, वेस्ट विंडिज दौऱ्यातून बाहेर?
K L Rahul tests positive : भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
![Coronavirus : केएल राहुलला कोरोनाची लागण, वेस्ट विंडिज दौऱ्यातून बाहेर? KL Rahul tests COVID-19 positive Coronavirus : केएल राहुलला कोरोनाची लागण, वेस्ट विंडिज दौऱ्यातून बाहेर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/21/86d002ecb84b98ef8f0e6c3d4962502e1658415937_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
K L Rahul tests positive : भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुलला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राहुल सध्या बेंगळरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहे. राहुलला वेस्ट विंडिज दौऱ्यासाठी राहुलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं, पण ते फिटनेस चाचणीवर आधारीत होतं.
केएल राहुल आयपीएल 2022 पासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात राहुलला टी 20 संघाचा कर्णधार करण्यात आलं होतं. पण दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातूनही राहुलला मुकावं लागलं होतं. आता वेस्ट विडिंज विरोधातही राहुलला खेळता येणार नाही. राहुलने काही महिन्यांपूर्वी जर्मनी येथे हर्नियाचं ऑपरेशन केलं. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता त्याने हळूहळू सरावाला सुरुवात केली. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत केएल राहुल जोरदार सराव करत आहे. भारतीय संघात लवकरात लवकर पुनरागमन करण्यासाठी तो मेहनत घेताना दिसत आहे. केएल राहुल आशिया कपदरम्यान भारतीय संघात एन्ट्री करेल.
Star India batter K L Rahul tests positive for COVID-19
— Press Trust of India (@PTI_News) July 21, 2022
केएल राहुलची कारकिर्द
केएल राहुलनं भारतीय संघासाठी आतापर्यंत 42 एकदिवसीय आणि 43 कसोटी सामने खेळले आहेत. राहुलनं एकदिवसीय सामन्यात पाच शतक आणि दहा अर्धशतकांच्या मदतीनं 1 हजार 634 धावा केल्या आहेत. तर, कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 2 हजार 547 धावा केल्या आहेत. ज्यात सात शतक आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
वेस्ट विडिंज आणि भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)