Shocking: क्रिकेटविश्वात खळबळ! एकाच दिवशी तीन स्टार क्रिकेटपटूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Shocking: ऑस्ट्रेलियात येत्या आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धा रंगणार आहे. यापूर्वीच क्रिकेटविश्वात खळबळ माजवणारी माहिती समोर आलीय.
Shocking: ऑस्ट्रेलियात येत्या आक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात आगामी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) स्पर्धा रंगणार आहे. यापूर्वीच क्रिकेटविश्वात खळबळ माजवणारी माहिती समोर आलीय. स्टार क्रिकेटपटू लेंडल सिमन्स (Lendl Simmons), दिनेश रामदीन (Denesh Ramdin) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. तर, इंग्लंडचा धडाकेबाज ऑलराऊंडर बेन स्टोक्सनं (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. एकाच दिवशी तीन स्टार क्रिकेटपटूंचा निवृत्तीचा निर्णय क्रिकेटप्रेमींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
1) लेंडल सिमन्स
वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज लेंडल सिमन्सनं मंगळवारी (18 जुलै 2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली. याबाबात सीपीएलमधील त्रिनबगो नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली. सिमन्सनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन शतकं आणि 16 अर्धशतक ठोकली आहेत. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्याभल्या गोलंदाजांनी त्याच्यासमोर गुडघे टेकले आहेत.
2) दिनेश रामदीन
वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीननं काल (18 जुलै 2022) आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय. तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर रामदीननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. मात्र, तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणं सुरूच ठेवणार आहे.
3) बेन स्टोक्स
इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन स्टोक्सनं मंगळवारी (18 जुलै 2022) एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानं त्याच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन एक भावूक पोस्ट लिहित ही माहिती दिली. या पोस्टद्वारे त्यानं इंग्लंडचा एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार जोस बटलरसह संपूर्ण इंग्लंड क्रिकेटचे आभार मानत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना आज डरहम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात बेन स्टोक्स इंग्लंडच्या संघाचं शेवटचं प्रतिनिधित्व करेल.
हे देखील वाचा-