Ben Stokes : केवळ 31 व्या वर्षी स्टोक्सने घेतली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती, नेमकं कारण काय?
Ben Stokes Retirement : एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय बेन स्टोक्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिला असून यावेळी निवृत्ती घेण्याचं कारणही सांगितलं आहे.
Ben Stokes Retirement : जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीची (Ben Stokes Retirement) माहिती दिली. त्याच्या अशा अचानकपणे निवृत्ती घेण्यामागे नेमकं कारण काय असावं असा प्रश्न क्रिकेट जगताला पडला असून स्टोक्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने याबद्दल माहिती दिली आहे.
नुकतीच भारताने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 ने इंग्लंडला मात दिली. दरम्यान या मालिकेत स्टोक्सने खास कामगिरी केली नाही. पण त्याच्या निवृत्तीमागे हेच कारण नसून त्याला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं अवघड झालं असल्याचं म्हटलं आहे. तसंच कसोटी आणि टी20 क्रिकेटमध्ये अधिक योगदान देऊ शकतो असंही त्याने म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटला स्टोक्स?
'मी इंग्लंडसाठी अखेरचा एकदिवसीय सामना मंगळवारी डरहममध्ये खेळणार असून त्यानंतर ही या प्रकारातून निवृत्ती घेणार आहे. हा निर्णय घेणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. मी इंग्लंडसाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळलेला प्रत्येक मिनिट मला खूप जवळ आहे. हा एक सुंदर प्रवास होता. पण हा निर्णय घेण्यापेक्षा अवघड मी माझा 100 टक्के सहभाग माझ्या संघाला देऊ शकत नाही हे आहे. मागील 11 वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळत असून आता तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणं माझ्यासाठी अवघड होत असून माझं शरीरही या संपूर्ण वेळापत्रकासाठी खास साथ देत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे माझ्याजागी कर्णधार जोस आणि संघाला एक चांगला खेळाडू मिळू शकतो. तसंच या निर्णयानंतर मी कसोटी आणि टी20 क्रिकेटसाठी जास्त चांगल्याप्रकारे संघाला सहकार्य करु शकेन.'
View this post on Instagram
हे देखील वाचा-
- Ben Stokes Retirement : मोठी बातमी! इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त
- ENG vs IND: भारतानं इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली; हार्दिक पांड्या, ऋषभ पंत ठरले विजयाचे शिल्पकार
- Babar Azam Record: विराटनं शुभेच्छा देऊन काही तास उलटले नाही, तोच बाबर आझमचा नवा पराक्रम!