Jhulan Goswami: झुलन गोस्वामीची ऐतिहासिक कामगिरी; विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी केली बरोबरी
Jhulan Goswami: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील आठवा सामना खेळला जात आहे.
Jhulan Goswami: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. झुलननं आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी गोलंदाज लिन फुलस्टन यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. लिन फुलस्टनच्या नावावर 39 विकेट्सची नोंद आहे.
महिला विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू लिन फुलस्टनच्या नावावर होता. लिननं 1982 ते 1988 दरम्यान विश्वचषकात 39 विकेट घेतल्या होत्या. झुलननं आज न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात मार्टिनच्या रुपात विश्वचषकातील 39वा विकेट्स घेतला. भारत आपला पुढचा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध खेळला जाणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात झुलन गोस्वामी आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकते.
न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं 9 षटकात 41 धावा देऊन एक विकेट मिळवली. यात एका निर्धाव षटकाचा समावेश आहे. झूलननं आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी, 197 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. तिनं कसोटी सामन्यात 44 आणि एकदिवसीय सामन्यात 248 विकेट्स घेतले आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये 56 विकेट्स घेतले आहेत.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडच्या संघाला पहिला धक्का सुझी बेट्सच्या रूपानं बसला. पूजा वस्त्राकरनं शानदार थ्रो मारत सुझीला वैयक्तिक 5 धावांवर बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर सोफी डिव्हाईन (35), अमेलिया केर (50) आणि एमी सॅटरथवेट (75) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर 261 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून पूजा वस्त्राकरनं सर्वाधिक चार विकेट्स घेतले. तर, राजेश्वरी गायकवाडनं दोन विकेट्स मिळवल्या.
हे देखील वाचा-
- Sreesanth Retirement: तो पुन्हा परतणारचं नाही, एस. श्रीशांतचा मोठा निर्णय
- Happy Birthday Parthiv Patel : 17 वर्षाचा असताना डेब्यू करणारा भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेलचा वाढदिवस, इतके वर्षे खेळूनही शतकापासून पार्थिव दूरच
- ICC Test Rankings : रवींद्र जाडेजा कसोटीमधील अव्वल अष्टपैलू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha