Jasprit Bumrah : आयपीएल दरम्यान मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये काय सुरु असायचं? हार्दिक पांड्याबाबत बुमराहनं सगळं सांगितलं
Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनपदाच्या वादावर जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच बोलला आहे. हार्दिक पांड्याबाबत त्यानं महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई: आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सर्वाधिक चर्चा झाली होती. मुंबई इंडियन्सनं पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन बाजूला करुन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघाची धुरा सोपवली होती. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटनं कॅश डील ट्रेड करुन संघात घेतलं आणि कर्णधार केलंहोतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. मुंबई इंडियन्सचे चाहते संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. हार्दिक पांड्याला मैदानावर आणि सोशल मीडियावर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. हे सर्व घडत असताना मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये कसं वातावरण होतं, याबाबतच सत्य जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) सांगितलं आहे. .
जसप्रीत बुमराहनं आयपीएल सुरु असताना मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये काय घडत होतं हे सांगितलं. जसप्रीत बुमराह म्हणाला की त्यावेळी सर्वजण एकमेकांना पाठिंबा देत होते.हार्दिक पांड्याला देखील सर्व जण पाठिंबा देत होते. नव्या कर्णधारासोबत टीममधील सर्व जण चांगल्या प्रकारे चर्चा करत होते, बोलत होते. बुमराहनं याबाबत अधिक बोलताना म्हटलं काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात.
'इंडियन एक्सप्रेस', सोबत बोलताना म्हटलं की "आम्ही एक टीममधून कोणत्याही व्यक्तीला मागं टाकू शकत नाही. आम्ही तिथं एकमेकांसाठी उपलब्ध होतो. आम्ही सर्व जण एकमेकांची मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. हार्दिकप पांड्यासोबत बराच काळ सोबत खेळलो आहे. आम्ही एकत्र होतो आणि जिथं गरज असल तिथं हार्दिक पांड्याची मदत करत होतो, असं बुमराहनं म्हटलं.
जसप्रीत बुमराहने पुढं म्हटलं, " तेव्हा तुम्हाला अंतर्गत वर्तुळ मदत करत असतं,आम्ही टीम म्हणून काही गोष्टींना प्रोत्साहन देत नाही. मात्र, एक टीम म्हणून आम्ही सर्व जण हार्दिक पांड्यासोबत होतो. आम्ही त्याच्यासोबत चर्चा करत होतो. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात. जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सर्व गोष्टी बदलल्या, असं बुमराह म्हणाला.
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर गोष्टी बदलल्या
भारतानं जून महिन्यात झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. भारतानं बारबाडोसच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची होती. यानंतर चाहत्यांचं धोरण बदललं. टी 20 वर्ल्ड कप विजयाचा हिरो म्हणून हार्दिक पांड्याकडं पाहिलं जात आहे, असं बुमराहनं म्हटलं.
संबंधित बातम्या :
रोहित शर्माचा चाहत्यांना चकवा, मुंबई विमानतळावर पत्नी अन् लेकीसह दाखल, पाहा व्हिडीओ