Rohit Sharma : हिटमॅन सुट्टी संपवून मुंबईत दाखल, रोहित शर्मा पत्नी अन् लेकीसह चाहत्यांना चकवा देत लॅम्बोर्गिनीतून रवाना, पाहा व्हिडीओ
Rohit Sharma Return India: भारताचा वनडे आणि कसोटी टीमचा कॅप्टन रोहित शर्मा अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर भारतात दाखल झाला आहे. श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेत तो खेळताना पाहयाला मिळेल.
मुंबई: भारताला (Team India) टी 20 वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मा सहकुटुंब सुट्टीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा विम्बल्डनमध्ये टेनिस पाहायला पोहोचल्याचं समोर आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत होता. आगामी भारत आणि श्रीलंका (IND vs Sri Lanka) यांच्यातील एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा मुंबईत दाखल झाला आहे. मुंबई विमानतळावर रोहित शर्मासोबत त्याची पत्नी रितिका सचदेह आणि मुलगी समायरा शर्मा पाहायला मिळाली.
रोहित शर्माचा चाहत्यांना चकवा, चार कोटींच्या लॅम्बोर्गिनीतून रवाना
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. रोहित शर्मा भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कॅप्टन आहे. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी सुट्टी संपवून रोहित शर्मा मुंबईत दाखल झाला. मुंबई विमानतळावर रोहित शर्मानं चाहत्यांना चकवा दिला. चार कोटींच्या लॅम्बोर्गिनीतून रोहित शर्मा, रितिका सचदेह आणि समायरा शर्मा विमानतळावरुन रवाना झाले.
व्हायरल व्हिडीओत रोहित शर्मा, रितिका सचदेह आणि समायरा शर्मा पाहायला मिळतात. रोहित शर्मा विमानतळावर गडबडीत असल्याचं दिसून आपलं. विमानतळाबाहेर असलेल्या लॅम्बोर्गिनीतून रोहित शर्मा चाहत्यांना चकवा देत रवाना झाला. रोहित शर्माच्या लॅम्बोर्गिनीची किंमत 4.18 कोटी रुपये इतकी आहे.
रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कप नंतर पहिल्यांदा मैदानावर
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं तब्बल 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं. रोहित शर्मासह विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी त्यानंतर निवृत्ती घेतली. रोहित शर्मा आता भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचं नेतृत्त्व करतोय. भारताचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरु होत आहे. 27 जुलैपासून टी 20 मालिका सुरु होत आहे. या मालिकेसाठी गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे. आता एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे खेळाडू भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळतील.
दरम्यान, रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक विक्रम नावावर करु शकतो. तो म्हणजे, एकदिवसीय सामन्यात एक हजार चौकार पूर्ण होण्यासाठी त्याला 6 चौकारांची गरज आहे. सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी एकदिवसीय सामन्यात 1 हजार चौकार मारले आहेत.
Cutiessss Back 💕🥹🤌✨..!!#RohitSharma𓃵 #RitikaSajdeh pic.twitter.com/IHLJWh6daN
— Neha_love._.45💌 (@NehaDubey187150) July 25, 2024
संबंधित बातम्या :
IND vs SL : श्रीलंकेला 24 तासात दुसरा धक्का,स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर,भारताचा सामना कसा करणार?
घटस्फोटानंतरही स्वत:ला रोखू शकला नाही; नताशाची पोस्ट अन् हार्दिक पांड्याची कमेंट, काय म्हणाला?