Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कधीपर्यंत करणार मैदानात पुनरागमन? जाणून घ्या दुखापतीबाबतचे ताजे अपडेटस्
Jasprit Bumrah Injury : भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पाठीची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच झाली आहे.
![Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कधीपर्यंत करणार मैदानात पुनरागमन? जाणून घ्या दुखापतीबाबतचे ताजे अपडेटस् Jasprit Bumrah set to return NCA after successful back injury Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह कधीपर्यंत करणार मैदानात पुनरागमन? जाणून घ्या दुखापतीबाबतचे ताजे अपडेटस्](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/27/b1ee08b9feba0fab0ca6ba4cbd2666fc1677437690117625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jasprit Bumrah Injury update : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नुकतीच न्यूझीलंडमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर बुमराह आणखी किमान 6 महिने तरी क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी BCCI बुमराहला परत संघात घेऊ इच्छित आहे. दरम्यान अशीही माहिती समोर येत आहे की, बुमराह लवकरच एनसीएमध्ये परतणार आहे.
बुमराहच्या दुखापतीचे अपडेट काय?
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, 'बुमराहच्या पाठीची स्थिती अजूनही पूर्णपणे फिट नाही. मागील वेळी बुमराहचे पुनरागमन घाईत झाले होते. कारण त्यावेळी तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागला. पण यावेळी आम्ही याबाबत खूप गंभीर आहोत कारण चुकीचा निर्णय त्याच्या करिअरसाठी खूप घातक ठरू शकतो. त्याचवेळी, अहवालानुसार, बुमराह या महिन्याच्या अखेरीस नाही तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतात परत येऊ शकतो. यानंतर एनसीए त्याच्या पुनरागमनासाठी संपूर्ण योजना तयार करेल. बुमराह दुखापतीमुळे आधीच आयपीएल 2023 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून बाहेर पडला आहे.
बुमराह किती दिवसात परतणार?
बुमराह कधी पुनरागमन करेल हे सांगणे सध्या कठीण आहे. इनसाइटस्पोर्ट्सच्या बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बुमराहच्या पुनरागमनाची तारीख सांगणे कठीण आहे. एकदा तो शस्त्रक्रियेतून बरा झाला की त्याचे पुनर्वसन केले जाईल आणि पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतरच तो केव्हा पुनरागमन करू शकतो हे आम्हाला कळेल. असे संबधित अधिकाऱ्याने सांगितले.
कधी झाली दुखापत?
जुलै 2022 मध्ये जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेनंतर पाठदुखी सतावू लागली. त्यानंतर तो तिसरा सामना खेळला नाही. ऑगस्ट 2022 मध्ये, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. वेळेत तंदुरुस्त न झाल्यामुळे तो ऑगस्ट 2022 मध्ये आशिया कपमधून बाहेर पडला होता. सप्टेंबर 2022 मध्ये, त्याने T20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन केलं. या मालिकेत 5 षटकं टाकल्यानंतर त्याची जुनी दुखापत पुन्हा सतावू झाली. ऑक्टोबर 2022 मध्ये तो T20 विश्वचषकातून बाहेर पडला. नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्याला तो मुकला होता. डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकलो नाही. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात होता पण पाठदुखीमुळे त्याने माघार घेतली. फेब्रुवारी 2023 मध्ये, जसप्रीत बुमराहला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी, आयपीएल आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून वगळण्यात आलं आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)