T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात दम दाखवण्यासाठी आयर्लंड संघ सज्ज, सीआयकडून 15 सदस्यीय संघाची घोषणा
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयर्लंड क्रिकेट (Cricket Ireland) आज (20 सप्टेंबर, मंगळवार) संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयर्लंड क्रिकेट (Cricket Ireland) आज (20 सप्टेंबर, मंगळवार) संघानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. अँड्र्यू बालबिर्नी (Andrew Balbirnie) नेतृत्वाखाली आयर्लंडचा संघ मैदानात उतरणार आहे. अलिकडंच्या काळात आयर्लंडचा संघानं सातत्यानं चांगली कामगिरी करून दाखवली. परंतु, यंदाच्या टी-20 विश्वचषकात आयर्लंडचा संघ कशी कामगिरी बजावतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ट्वीट-
Ireland’s squad for the ICC Men’s T20 World Cup 2022 is out ☘️
— ICC (@ICC) September 20, 2022
Details 👇https://t.co/CI2pWn5sbq
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 16 संघ येणार आमने-सामने
टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. ज्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नामिबिया, स्कॉटलँड, श्रीलंका, वेस्ट इंडीज, आयर्लंड, यूएई, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेच्या संघाचा समावेश आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या या आठ संघांनी सुपर 12 साठी पात्रता मिळवली आहे.
आस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
टी-20 विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ:
अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), मार्क एडेअर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलनी, जॉर्ज डॉकरेल, स्टीफन डोहेनी, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, कोनर ऑल्फर्ट, सिमी सिंह, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, क्रेग यंग.
हे देखील वाचा-
- Africa Cricket Asociation Cup: जबरदस्त! 20 षटकांचा सामना अवघ्या 20 चेंडूतच संपवला; टी-20 क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम
- IND vs AUS, 1st T20, Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी20 मध्ये पाऊस येणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?
- T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा टी20 विश्वचषकासाठीचा संघ जाहीर, विल्यमसन कर्णधार, तर गप्टील सातव्यांदा खेळणार टी20 वर्ल्डकप