(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 ऑक्शनदरम्यान जय शाहांनी 'गूड न्यूज'! अमित शाह झाले आजोबा
Amit Shah Blessed With Grand Child : IPL 2025 ऑक्शनदरम्यान जय शाह यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अमित शाह आजोबा झाले आहेत.
Jay Shah Blessed With Baby Boy : आयपीएल 2025 ऑक्शनदरम्यान BCCI चे सचिव जय शाह यांनी आणखी एक गूड न्यूज दिली आहे. जय शाह यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. जय शाह यांची पत्नी रिषिता पटेल-शाह यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. IPL 2025 मेगा लिलावाचा पहिला दिवस म्हणजेच 24 नोव्हेंबर जय शाहसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आनंदाची बातमी म्हणजे त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. अमित शाह आजोबा झाले आहेत. आयसीसीचे चेअरमन जय शाह हे अमित शाह यांचे चिरंजीव आहेत.
IPL 2025 ऑक्शनदरम्यान जय शाहांनी 'गूड न्यूज'!
आयपीएल 2025 मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होत आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक मोठी गोड बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्या घरी पाळणा हलला आहे. जय शहा यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जय शाह यांची पत्नी ऋषिता पटेल यांनी 24 नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला आहे. जय शाह आधीच दोन मुली आहेत.
जय शाह यांच्यासाठी डबल 'गूड न्यूज'
जय शाहासाठी हा क्षण दुहेरी आनंद घेऊन आला आहे. जय शाह डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्याआधी त्यांना एक गूड न्यूज मिळाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत, जय शाह यांची ICC चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ते न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे, कारण पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीला हे महत्त्वाचं पद भूषवण्याची संधी मिळाली आहे.
रविवार 24 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये आयपीएल 2025 मेगा ऑक्शनदरम्यान जय शाह यांच्याशी संबंधित ही आनंदाची बातमी मिळाली आहे. या मोठ्या कार्यक्रमात आयपीएल चेअरमन अरुण धुमाळ यांनी जय शाह यांना मुलगा झाल्याची गोड बातमी शेअर केली. अरुण धुमाळ यांनी जय शाह यांचं अभिनंदन करत सोशल मीडियावर यासंबंधित घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलंय, "भारताचा मैदानाबाहेरचा कर्णधार" असे त्यांचे वर्णन केले. तो म्हणाला, "मी भारताचा मैदानाबाहेरचा कर्णधार जय शाह यांना त्याच्या मुलाच्या जन्माबद्दल अभिनंदन करतो."
महत्त्वाच्या इतर बातम्या :