IPL 2025 Auction : 1 नाही, हे 3 स्टार लिलावापूर्वी बदलणार संघ? रोहित शर्माशिवाय 'या' दिग्गजांची नावे आले समोर
आयपीएलच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच बीसीसीआयकडून रिटेनशन पॉलिसी जारी केली जाईल.
IPL 2025 Auction 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामाची तयारी सुरू झाली आहे. लवकरच बीसीसीआयकडून रिटेनशन पॉलिसी जारी केली जाईल, यासोबतच संघ किती खेळाडूंना कायम ठेवू शकतात हेही ठरवतील. यावेळी, असे काही खेळाडू देखील सोडले जाऊ शकतात, ज्यांचा याआधी विचारही केला नसेल. म्हणजे मोठे खेळाडू सोडले तर लिलावही जोरदार होण्याची शक्यता आहे. जरी अद्याप कोणत्याही संघाने कोणालाही सोडले नाही, परंतु यावेळी अनेक मोठे खेळाडू संघाची साथ सोडू शकतात अश्या बातम्या येत आहे.
मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्माला सोडणार?
आयपीएल 2025 पूर्वी ज्या खेळाडूंना सोडले जाण्याची शक्यता आहे, त्यापैकी पहिले आणि मोठे नाव रोहित शर्माचे आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्ससोबत जे काही घडलं ते पाहता रोहित शर्माला कदाचित एमआयमधून सोडण्यात येईल असं वाटतंय. एका लीक झालेल्या चॅटमध्ये रोहित 2024 चा सीझन हा त्याचा शेवटचा सीझन असेल असे म्हणत होता. आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे आणि असे मानले जाते की यावेळी रोहितला सोडण्यात येईल आणि तो लिलावात जाईल, जिथे तो दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसेल.
लखनऊ केएल राहुलला सोडणार?
रोहित शर्मानंतर केएल राहुल हे दुसरे मोठे नाव असेल. तो सध्या लखनऊचा कर्णधार आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघ कोणताही चमत्कार करू शकला नाही. आता केएल राहुल भारताच्या टी-20 संघाचा भागही नाही. तसेच राहुलची स्वत:ची कामगिरी अशा प्रकारची नाही की, तो आपले स्थान पक्के करू शकेल. याचा अर्थ त्यालाही सोडले जाऊ शकते, अशा परिस्थितीत तोही नव्या संघात दिसल्यास नवल वाटायला नको.
आरसीबी फाफ डू प्लेसिसला सोडणार?
आरसीबीची नेहमीच चर्चा होत असते. हा असा संघ आहे ज्याने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही, परंतु असे असूनही या संघाचे चाहते कमी होत नाही. संघाची कमान सध्या फाफ डू प्लेसिसच्या हाती आहे. सध्या त्यांचे वय 40 च्या आसपास आहे. मेगा लिलाव तीन वर्षांसाठी आहे, त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसताना आरसीबी संघ त्याला आपल्यासोबत ठेवेल की नाही याबाबत शंका आहे. पुढील लिलावात आरसीबी संघ नक्कीच नवीन कर्णधाराचा शोध घेईल, अशा परिस्थितीत डू प्लेसिस देखील या संघासोबत दिसणार नाही.
हे ही वाचा -