ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत NCA कडून ग्रीन सिग्नल, आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा
IPL Rishabh Pant : इंडियन प्रिमिअर लीग (indian premier league) म्हणजेच आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
IPL Rishabh Pant : इंडियन प्रिमिअर लीग (indian premier league) म्हणजेच आयपीएल 2024 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीचा पूर्वाश्रमीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आता आयपीएल खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. एससीएकडून पंतला (Rishabh Pant) फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त 'आज तक'ने दिले आहे.
लवकरच दिल्लीच्या संघात परतणार ऋषभ पंत
सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभ पंतला (Rishabh Pant) एनसीएकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्याला फिटनेसचे सर्टिफिकेट एनसीएकडून बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना दिसू शकतो. आयपीएल 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही
काही दिवसांपूर्वीच दिल्लीने ऋषभ पंतचा (Rishabh Pant) संघात समावेश केला नाही, अशी बातमी समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऋषभ पंतला फिटनेस क्लिअरंस सर्टिफिकेट मिळालेले नाही. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतचा फिटनेस रिपोर्ट मागितला होता. मात्र, दिल्लीच्या संघाला बीसीसीआयकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ऋषभ पंत सध्या आयपीएल 2024 च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो काही दिवसांसाठी दिल्लीत पण येणार आहे. आयपीएल 2024 चे सुरुवातीचे सामने दिल्लीचा संघ विशाखापटनम येथे खेळणार आहे. त्यामुळे फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ऋषभ पंत डायरेक्ट वायझॅग येथे पोहोचू शकतो.
पंत दिल्लीचे नेतृत्व करणार का?
ऋषभ पंत (Rishabh Pant) आगामी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळणार की, केवळ फलंदाज म्हणून खेळणार याबाबत दिल्लीच्या संघाने बोलण्यास नकार दिला आहे. शिवाय दिल्ली कॅपिटल्सने ऋषभबाबत (Rishabh Pant) कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स ऋषभचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील करियर विचारात घेऊन त्याच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही. शिवाय ऋषभ यष्टीरक्षक म्हणून देखील खेळणार नाही.
दिल्ली कॅपिटल्स ऋषभच्या पुनरागमनासाठी उत्सुक
दिल्ली कॅपिटल्सचा संघ ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनासाठी उत्सुक आहे. कारण गेल्या हंगामात तो नसताना दिल्लीची आयपीएलमधील कामगिरी सुमार राहिली होती. त्यामुळे दिल्ली त्याचे दमदार पुनरागमन व्हावे, यासाठी उत्सक आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 2024 च्या हंगामातील पहिला सामना 23 मार्च रोजी पंजाब किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
IPL 2024: धोनीला मोठा धक्का; चेन्नईचे दोन धुरंधर दुखापतग्रस्त; आयपीएलमधून बाहेर होण्याची शक्यता