मुलगा समोर दिसताच जवळ घेतलं, मायेने कुरवाळलं; विश्वविजेत्या रोहितची आई भावुक; 'तो' क्षण व्हायरल!
टी-20 विश्वचषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे मुंबईत दिमाखात स्वागत करण्यात आले. यावेळी मुंबईत लाखो क्रिकेट चाहते जमा झाले होते.
मुंबई : टी-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) आपलं नाव कोरून, टीम इंडिया भारतात परतली आहे. मातृभूमीत आल्यानंर भारतीय संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. या संघाच्या कौतुकासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खास अभिनंदनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या विजयासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारतीय जनतेकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून हे खेळाडू भारताला जेतेपद मिळवून देण्यासाठी जिवाचं रान करत होते. दरम्यान, आता रोहित शर्माचा आपल्या कुटुंबीयांसोबतचा एक खास क्षण सध्या व्हायरल होत आहे. आपल्या मुलाला पाहून रोहितची आई भावूक झाली आहे.
रोहितला मायेने घेतले जवळ
टीम इंडिया मुंबईत आल्यानंतर त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्ह इंडिया या परिसरात लाखो लोकांनी टीम इंडियासाठी गर्दी केली होती. दरम्यान, हा सोहळा पार पडल्यानंतर रोहितने आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. रोहित आपल्या आईकडे गेला. पूर्णिमा शर्मा (Purnima Sharma) म्हणजेच रोहितच्या (Rohit Sharma) आईदेखील आपल्या मुलाला पाहून भावुक झाल्या. त्यांनी रोहितला मायेने जवळ घेतले आणि प्रेमाने रोहितची पप्पी घेतली. आपल्या आईला पाहून रोहितही काही क्षणासाठी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. लोक या व्हिडीओला भरभरून लाईक करत आहेत. आई-मुलाच्या या निखळ प्रेमाने समस्त भारतीय भारावून गेले आहेत.
पाहा व्हिडीओ :
ओपन डेक बसची सोय, स्वागतासाठी लाखोंनी चाहते
दरम्यान, टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर या खेळाडूंसाठी अभिनंदन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. फॅन्शच्या शुभेच्छांचा स्वीकार करता यावा यासाठी टीम इंडियासाठी एका खास ओपन डेक बसची सोय करण्यात आली होती. या बसमधून टीम इंडियाचे खेळाडू आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते. हा सोहळा पाहून भारतीय संघदेखील चांगलाच हरखून गेला. या संघाचे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर छोटेखानी स्वागत करण्यात आले. हा सोहळा पाहून भारतीय संघदेखील भारावून गेल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
हेही वाचा :
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...