Rohit Sharma: रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षे पूर्ण! चाहत्यांसाठी हिटमॅननं लिहिली खास पोस्ट
Rohit Sharma Completes 15 Years in International Cricket: भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवश खूप खास आहे.
Rohit Sharma Completes 15 Years in International Cricket: भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी आजचा दिवश खूप खास आहे. आजच्या दिवशी 15 वर्षापूर्वी रोहित शर्मानं भारताकडून आयर्लंडविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यासंदर्भात नुकतंच रोहित शर्मानं ट्वीट केलं. तसेच भारतासाठी नेहमी चांगली कामगिरी करण्याचा त्याच्या प्रयत्न राहील, असंही त्यानं म्हटलंय.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील 15 वर्षांच्या प्रवासावर रोहित शर्मानं केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलंय की, "आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी मी भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. हा एक प्रवास आहे जो मी नक्कीच आयुष्यभर जपत राहीन. या प्रवासाचा भाग असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. मी भारतासाठी खेळावं म्हणून ज्यांनी मला मदत केली त्यांचं विशेष आभार. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि समीक्षकांचे आभार, संघासाठी तुमचे प्रेम आणि समर्थन हेच आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते."
रोहित शर्माची ट्विटर पोस्ट-
𝟭𝟱 𝘆𝗲𝗮𝗿𝘀 in my favourite jersey 👕 pic.twitter.com/ctT3ZJzbPc
— Rohit Sharma (@ImRo45) June 23, 2022
रोहित शर्माची कारकीर्द
रोहित शर्मानं आतापर्यंत 45 कसोटी, 230 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 9 हजार 283, कसोटीत 3 हजार 137 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 313 धावा केल्या आहेत. रोहितच्या नावावर कसोटीत 8, एकदिवसीय सामन्यात 29 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार शतकांची नोंद आहे.
रोहितच्या नेतृत्वात भारत इंग्लंडशी भिडणार
भारत आणि इंग्लंड यांच्यात रिशेड्युल केलेला कसोटी सामना येत्या 1-5 जुलैदरम्यान खेळायचा आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून रोहित सेना इतिहास रचण्यासाठी सज्ज झालीय.
हे देखील वाचा-