(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sarfaraz Khan: रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये सर्फराज खानची बॅट तळपली, मध्य प्रदेशविरुद्ध ठोकलं शतक!
Ranji Trophy 2022 Final: सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
Ranji Trophy 2022 Final: बंळुरूच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सर्फराज खाननं (Sarfaraz Khan) मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलं आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच मुंबईच्या संघाला शम्स मुलानी आणि तनुष कोटियन रुपात दोन मोठे झटके बसले. मात्र, सर्फराजनं एका बाजूनं संघाची बाजू संभाळून ठेवली. सध्या मुंबईच्या संघानं आठ विकेट्स गमावले असून मुंबईची धावा संख्या 350 पार गेली आहे. सर्फराज अजूनही क्रिजवर उपस्थित आहे.
सर्फराज खानची रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी
सर्फराज खानने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशविरुद्ध अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाला धावांची आवश्यकता असताना सर्फराजनं शतक ठोकलंय. विशेष म्हणजे, सर्फराजनं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलं आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 800 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. यासह त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागं टाकलंय.
नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावा करून बाद झाला. मुंबईच्या संघानं 350 धावांचा टप्पा पार केला असून 119 धावांसह मैदानात उपस्थित आहे.
हे देखील वाचा-
- Jos Buttler: जोस बटलरचा पराक्रम! सर्वात कमी चेंडूत चार धावा, शाहीद आफ्रिदी आणि डेव्हिड वॉर्नरला टाकलं मागं
- Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईला दोन मोठे झटके, सर्फराज खान क्रिजवर
- 1983 World Cup: झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी, पण कॅमेऱ्यात रेकार्ड नाही; वाचा कारण