Ranji Trophy 2022 Final: मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सर्फराज खानला अश्रू अनावर
मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीचा यंदाचा हंगाम चांगला गेला. सध्या बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यानं मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलंय.
Ranji Trophy 2022 Final: मुंबईचा फलंदाज सर्फराज खाननं रणजी ट्रॉफीचा (Sarfaraz Khan) यंदाचा हंगाम चांगला गेला. सध्या बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यानं मध्य प्रदेशविरुद्ध शतक झळकावलंय. ज्यात 12 चौकारांचा समावेश आहे. या हंगामातील त्याचं चौथे शतक आहे. अवघ्या सहाव्या सामन्यात सर्फराजनं हे चौथे शतक आहे. सरफराज खाननं हंगामात 150 च्या सरासरीनं 900 हून अधिक धावा केल्या आहेत.
मध्य प्रदेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात शतक झळकावताच सर्फराज खानला अश्रु अनावर झालं. तसेच शतकानंतर त्यानं सिद्धु मुसेवालाच्या शैलीतही सेलिब्रेशन केलं. रणजी ट्रॉफीच्या 87 वर्षांच्या इतिहासात सर्फराज खान दोन हंगामात 900 धावांचा टप्पा पार करणारा केवळ खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीतील 34 डावात त्यानं आठ वेळा शंभरचा आकडा गाठलाय. तर, सात वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत.
व्हिडिओ-
💯 for Sarfaraz Khan! 👏 👏
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 23, 2022
His 4⃣th in the @Paytm #RanjiTrophy 2021-22 season. 👍 👍
This has been a superb knock in the all-important summit clash. 👌 👌 #Final | #MPvMUM | @MumbaiCricAssoc
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/gv7mxRRdkV
रणजी ट्रॉफीच्या मागील 12 सामन्यात सात शतक
सरफराज खानने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशविरुद्ध अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाला धावांची आवश्यकता असताना सरफराजनं शतक ठोकलंय. विशेष म्हणजे, सरफराजनं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलं आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 800 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. यासह त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागं टाकलंय.
नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. कर्णधार पृथ्वी शॉचं अर्धशतक हुकलं. तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावा करून बाद झाला. मुंबईच्या संघानं 350 धावांचा टप्पा पार केला असून 119 धावांसह मैदानात उपस्थित आहे.
हे देखील वाचा-
- Sarfaraz Khan: रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये सरफराजची बॅट तळपली, मध्य प्रदेशविरुद्ध ठोकलं शतक!
- Jos Buttler: जोस बटलरचा पराक्रम! सर्वात कमी चेंडूत चार धावा, शाहीद आफ्रिदी आणि डेव्हिड वॉर्नरला टाकलं मागं
- Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईला दोन मोठे झटके, सरफराज खान क्रिजवर