Jos Buttler: जोस बटलरचा पराक्रम! सर्वात कमी चेंडूत 4000 धावा, शाहीद आफ्रिदी आणि डेव्हिड वॉर्नरला टाकलं मागं
Jos Buttler: इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात आक्रमक खेळाडूंपैकी एक मानला जातो.
Jos Buttler: इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात आक्रमक खेळाडूंपैकी एक मानला जातो. अलिकडच्या वर्षांत जोस बटलरनं सातत्यानं चमकदार कामगिरी करून दाखवली. जोस बटलरची गणना आज सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये केली जाते.याचदरम्यान, जोस बटलरनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत चार हजारांचा ठप्पा गाठणाऱ्या फलंदाजाच्या पंक्तीत त्यानं स्थान मिळवलं आहे. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वार्नरलाही मागं टाकलं आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 281 चेंडूत चार हजार धावा
जोस बटलरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 281 चेंडूत 4,000 धावांचा टप्पा पार केला. या यादीत पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीद आफ्रिदीनं 3 हजार 930 चेंडूत 4,000 धावा केल्या होत्या. त्यानंतर 4 हजार 128 चेंडूत 4,000 धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा विस्फोटक माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवागनं 4 हजार 131 चेंडूत चार हजार धावांचा टप्पा गाठला होता. सर्वात कमी चेंडूवर 4,000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉक पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 हजार 255 चेंडूत चार हजार धावा केल्या होत्या.
सर्वात कमी चेंडूत चार हजारांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांची यादी
क्रमांक | फलंदाज | चेंडू |
1 | जोस बटलर (इंग्लड) | 3 हजार 281 |
2 | शाहीद आफ्रिदी (पाकिस्तान) | 3 हजार 930 |
3 | डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) | 4 हजार 128 |
4 | वीरेंद्र सेहवाग (भारत) | 4 हजार 131 |
5 | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) | 4 हजार 255 |
आयपीएल 2022 मध्ये जोर बटलरची उत्कृष्ट खेळी
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. तसेच आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मानही त्यानं मिळवला. या हंगामात त्यानं 17 सामने खेळले आहेत. ज्यात 149.05 च्या सरासरीनं 863 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या हंगामात जोस बटलरनं चार शतक आणि चार अर्धशतकही ठोकले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळं त्याला ऑरेंज कॅप विजेता म्हणून गौरवण्यात आलं.
हे देखील वाचा-
- Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईला दोन मोठे झटके, सरफराज खान क्रिजवर
- 1983 World Cup: झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी, पण कॅमेऱ्यात रेकार्ड नाही; वाचा कारण
- On This Day: आजच्या दिवशी धोनीनं रचला इतिहास, आयसीसीच्या प्रमुख तिन्ही ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला कर्णधार!