यशस्वीची गगनभरारी! ICC Ranking मध्ये घेतली हनुमान उडी, विराटच्या जवळ पोहचला!
Yashasvi Jaiswal, ICC Test Ranking : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत (IND vs ENG) दोन द्विशतकं ठोकणाऱ्या यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking ) मोठा फायदा झालाय.
Yashasvi Jaiswal, ICC Test Ranking : इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत (IND vs ENG) दोन द्विशतकं ठोकणाऱ्या यशस्वी जायस्वालला (Yashasvi Jaiswal) आयसीसी क्रमवारीत (ICC Ranking ) मोठा फायदा झालाय. आयसीसी क्रमवारीमध्ये यशस्वी जायस्वाल यांनी गगणभरारी घेतली आहे. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली आहे. अवघ्या आठ कसोटी सामन्यानंतर यशस्वी जायस्वाल यानं टॉप 15 फलंदाजामध्ये स्थान पटकावलं आहे. यशस्वी विराट कोहलीच्या जवळ पोहचलाय. तो विराट कोहलीपासून फक्त दोन पावलं दूर आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत यशस्वी जायस्वाल यानं 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विराट कोहली आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेचा विराट कोहली भाग नाही. यशस्वी जायस्वाल याच्या नावावर 727 रेटिंग गुण आहेत. तर विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.
टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही -
कसोटी क्रमवारीत टॉप 5 फलंदाजांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल स्थानावर विराजमान आहे. विल्यमसनच्या नावावर 893 रेटिंग गुण आहेत. तर 818 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जो रुट 799 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 780 रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम 768 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
India and England stars rise in the latest ICC Test Player Rankings 📈https://t.co/wZltapMRzf
— ICC (@ICC) February 28, 2024
आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाज कोणत्या क्रमांकावर ?
विराट कोहली - 9
यशस्वी जायस्वाल - 12
रोहित शर्मा - 13
ऋषभ पंत - 14
शुभमन गिल - 31
रवींद्र जाडेजा - 37
चेतेश्वर पुजारा - 38
अजिंक्य रहाणे - 49
श्रेयस अय्यर - 52
अक्षर पटेल - 53
केएल राहुल - 55
ध्रुव जुरेल - 69
आर. अश्विन - 82
इंग्लंडविरोधात जायस्वालचा धमाका, खोऱ्याने चोपल्या धावा -
इंग्लंडविरोधात भारताने 3-1 कसोटी मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताने मालिका जिंकण्यामध्ये यशस्वी जायस्वाल याचा सिंहाचा वाटा आहे. चार कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वाल यानं खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. आठ डावामध्ये त्याने 94 च्या सरासरीने 655 धावा चोपल्या आहेत. यामध्ये दोन द्विशतकं आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत.
यशस्वी जायस्वाल यानं आठ कसोटी सामन्यातच आघाडीच्या 15 खेळाडूमध्ये स्थान पटकावलं आहे. यशस्वी जायस्वाल यानं आठ कसोटी सामन्यात 70 च्या सरासरीने 971 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अर्धशतकेही ठोकली आहेत. इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत यशस्वी जायस्वाल यानं सर्वाधिक षटकारही ठोकले आहेत.
आणखी वाचा :
Rohit Sharma : रोहित शर्मा पुढचा धोनी, सुरेश रैनानं का केलं हिटमॅनचं कौतुक?
IND vs ENG Test : धर्मशालाच्या मैदानात भारताचा रेकॉर्ड कसाय? जाणून घ्या सविस्तर
IND vs ENG : रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, धर्मशाला कसोटीत स्टार फलंदाजाला मिळणार संधी!
6,6,6,6,6,6,6,6 अवघ्या 33 चेंडूत शतक, रोहित शर्माचा विक्रम मोडला!
केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप, सारानं दिला गोंडस मुलीला जन्म!
IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास!
केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?
BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप
33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक
BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!