एक्स्प्लोर

केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप, सारानं दिला गोंडस मुलीला जन्म!

Kane Williamson New Zealand : न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप झालाय. त्याची पत्नी सारा विल्यमसन हिनं गोंडस मुलीला जन्म दिलाय.

Kane Williamson New Zealand : न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप झालाय. त्याची पत्नी सारा विल्यमसन हिनं गोंडस मुलीला जन्म दिलाय. बाप झाल्यानंतर केन विल्यमसन यानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केली. केन विल्यमसन याच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. केन विल्यमसन याचे जगभरात चाहते आहेत. तो भारतातही प्रसिद्ध आहे. त्यानं आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. 

केन विल्यमसन याच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हालला आहे. पत्नी सारा विल्यमसन हिनं मुलीला जन्म दिलाय. विल्यमसन याची मोठी मुलगी तीन वर्षांची आहे तर मुलगा एक वर्षांचा आहे. आता त्याच्या पत्नीनं आणखी एका मुलीला जन्म दिलाय. विल्यमसन यानं सोशल मीडियावर आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान, विल्यमसनआधी भारताचा क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला. अनुष्का शर्मानं गोंडस मुलाला जन्म दिला. 

सोशल मीडियावर दिली माहिती - 

केन विल्यमसन यानं इन्स्टाग्रामवर आनंदाची बातमी शेअर केली. त्यामध्ये त्यानं पत्नी सारा आणि मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलेय की, "Welcome to the world beautiful Girl. So grateful for your safe arrival and the exciting journey ahead ❤️ " केन विल्यमसनच्या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याशिवाय सहकारी खेळाडूंकडूनही विल्यमसनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विल्यमसनच्या फोटोवर आतापर्यंत चार लाखांपेक्षा जास्त लाईक्सचा वर्षाव झालाय. त्याशिवाय शेकडो कमेंट्स टाकल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kane Williamson (@kane_s_w)

केन विल्यमसन याला आआधी दोन मुलं आहेत. त्याची मोठी मुलगी 3 वर्षांची आहे, तिचं नाव मॅगी आहे. मुलाचं वय एक वर्षांचं आहे. विल्यमसन सध्या कौटुंबिक सुट्टीवर आहे. तो आपला पूर्ण वेळ पत्नी सारा आणि मुलांसोबत घालवत आहे. विल्यमसनआधी विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झालाय. कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनं मुलाला जन्म दिला. कोहली आणि अनुष्का यांनी आपल्या मुलाचं नाव अकाय असं ठेवलेय. विराट आणि अनुष्का यांच्या मुलीचं नाव वामिका आहे.  

आणखी वाचा : 

IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास! 

केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!

धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप

33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक

BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India ODI Squad Vs Afghanistan: बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
बुमराह, सिराज OUT, प्रिन्स, गुरनूर IN...; अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी
Team India Test Squad Vs Afghanistan: बुमराह, जडेजा OUT...मानव सुतार, हर्ष दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
बुमराह, जडेजा OUT...सुतार, दुबे IN; अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, चक्रावून टाकणारा संघ!
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
वैभव सूर्यवंशीची 93 धावांची स्फोटक खेळी! राजस्थान रॉयल्सचा लखनौवर 7 गडी राखून विजय
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 
अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा, शुभमन गिलच्या हाती संघाची धुरा 

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Gurnoor Brar: उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
उंची तब्बल साडे सहा फूट, पहिल्यांदा कॅप्टन गिलच्या नजरेत भरला, शिखर धवनलाही प्रभावित केलं अन् नेहरानं घडवून आकार दिलेला गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
Ajit Agarkar on Mohammed Shami: 'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
'मोहम्मद शमी फक्त आता..' निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांच्या 'अजब' उत्तराने सगळ्यांनीच डोक्याला हात लावला!
Gold Silver Price: सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
सोन्याच्या वाढत्या भावाला ब्रेक; चांदीतही मोठी पडझड, गुंतवणूकदार संभ्रमात; 10 ग्रॅम सोनं कितीवर?
Nagpur Crime News: नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
नवविवाहितेच्या मृत्यूने खळबळ, मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टेम केला; रिपोर्ट आल्यानंतर सगळे हादरले, नागपूरमधील धक्कादायक घटना
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
'पोलिसांच्या आडून कारवाई केल्यास जशास तसं प्रत्युत्तर, काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, पण शक्तिपीठ होऊ देणार नाही' सतेज पाटील अन् राजू शेट्टींनी सर्वपक्षीय मेळाव्यात रणशिंग फुंकलं, 9 जूनला महामोर्चा
Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Embed widget