IND vs ENG : रजत पाटीदारचा पत्ता होणार कट, धर्मशाला कसोटीत स्टार फलंदाजाला मिळणार संधी!
IND Vs ENG : धर्मशाला येथे सात मार्चपासून होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीसाठी (IND vs ENG) टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल निश्चित मानले जात आहेत.

IND Vs ENG : धर्मशाला येथे सात मार्चपासून होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीसाठी (IND vs ENG) टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल निश्चित मानले जात आहेत. कारण, रजत पाटीदार (rajat patidar) याला वगळण्यात येऊ शकतं. पाटीदार याला (Rajat Patidar) चार कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. युवा रजत पाटीदार यानं विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पण त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत रजत पाटीदार पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या जागी आता केएल राहुल अथवा देवदत्त पडिक्कल याच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. केएल राहुल अद्याप तंदुरुस्त नसल्याचं समोर आलेय. तो उपचारासाठी लंडनमध्ये गेलेला आहे. त्याला एनसीएकडून फिटनेस असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच टीम इंडियात स्थान मिळू शकते. केएल राहुल पूर्णपणे फिट असेल तर त्याचा प्लेईंग 11 मधील समावेश निश्चित मानला जातोय. पण केएल राहुल फिट नसल्यास देवदत्त पडिक्कलला टीम इंडियातून पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते. मात्र, केएल राहुलच्या खेळण्यावर येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
रजत पाटीदार फ्लॉप -
विराट कोहलीने मालिकेतून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी रजत पाटीदारला संघात स्थान देण्यात आले. रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. मात्र रजत पाटीदारला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. रजत पाटीदारने 3 सामन्यांच्या 6 डावात 63 धावा केल्या आहेत. रजत पाटीदारला 6 डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. मालिकेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ 32 धावा इतकी आहे. पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 32 धावांची खेळी केली होती. पण यानंतर रजत पाटीदारच्या बॅटमधून 5 डावात केवळ 31 धावा निघाल्या आहेत.
#RajatPatidar : Feel sad for him, made it to #India squad on a solid #FirstClass performance. What is causing him to freeze? His recent FC-only scoreline: 151, 4, 111 (Eng Lions); 9, 8* (Ranji); 33 (SA A). 73, 77 (List A - White Ball). Perhaps one more chance @ #Dharmashala ?
— Gowrishankar L (@gowrishankar_l) February 27, 2024
सरफराज-ध्रुवचं यशस्वी पदार्पण -
इंग्लंडविरोधात कसोटी मालिकेत संधी मिळाल्यानंतरही रजत पाटीदार याला चमकदार कामगिरी करता आली नाही. अत्यंत खराब कामगिरीनंतर आता रजत पाटीदारसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे दिसत आहे. याच मालिकेत सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही पदार्पणाची संधी देण्यात आली होती. या दोन्ही खेळाडूंनी संघातील प्रभावी कामगिरी करत आपले स्थान पक्के केले आहे. राजकोट कसोटीच्या दोन्ही डावांत सरफराज खानने अर्धशतके झळकावली. रांचीमध्ये टीम इंडियासाठी ध्रुव जुरेल एक हिरो म्हणून उदयास आला.
Maybe Devdutt Padikal can make debut. Rajat Patidar seems down mentally to me.
— Nambo (@nitin_nam) February 27, 2024
आणखी वाचा :
6,6,6,6,6,6,6,6 अवघ्या 33 चेंडूत शतक, रोहित शर्माचा विक्रम मोडला!
केन विल्यमसन तिसऱ्यांदा बाप, सारानं दिला गोंडस मुलीला जन्म!
IND vs ENG : आर. अश्विन आणि जॉनी बेयरस्टो धर्मशाला कसोटीत शतक निश्चित, मैदानात उतरताच रचणार इतिहास!
केएल राहुल लंडनमध्ये, धर्मशाला कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह!
धोनीच्या रेल्वेतील पहिल्या नोकरीचं अपॉईंटमेट लेटर व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?
BCCI च्या तंबीनंतर आली जाग, ईशान किशन मैदानावर परतला, पण पहिल्याच सामन्यात फ्लॉप
33 चौकार, 12 षटकार, IPL आधी चेन्नईच्या खेळाडूनं ठोकलं त्रिशतक
BCCI नं फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरला शाहणपण, मुंबई संघाकडून खेळणार!















