
IND vs SL: रविंद्र जाडेजाच्या नावावर आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद, 1973 नंतर 'असे' करणारा ठरला पहिला खेळाडू
IND vs SL Test Match, Day 3 : मोहाली कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाने श्रीलंकेविरुद्ध पाच विकेट घेत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावी केला आहे.

IND vs SL Test Match, Day 3 : सध्या मोहाली येथ भारत आणि श्रीलंकेदरम्यान पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून मोहाली कसोटीत श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 174 धावांत ऑलआऊट झाला. त्या आधी भारताने पहिला डाव 574 धावांवर घोषित केला होता. आता त्यांनी श्रीलंकेच्या संघाला फॉलोऑन दिला आहे. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने शानदार गोलंदाजी करत पाच बळी घेतले. यापूर्वी त्याने नाबाद 175 धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे जाडेजाने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावी केला आहे.
कसोटी डावात 150 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या तसेच पाच बळी घेतलेल्या खेळाडूंच्या विशेष यादीत जाडेजा सामील झाला आहे. अशी कामगिरी करणारा जाडेजा सहावा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे 1973 नंतर अशी कामगिरी करणारा रवींद्र जाडेजा हा पहिलाच खेळाडू आहे. तसेच ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
कसोटी डावात 150+ धावा करून पाच बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विनू मांकड पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध 184 धावा केल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. तर 1973 मध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मुस्ताक मोहम्मद यानेही न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेण्यासह 201 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर आता जाडेजाने तब्बल 49 वर्षांनंतर हा विक्रम केला आहे.
ज्या खेळाडूंनी कसोटी डावात 150+ धावा केल्या तसेच पाच बळी घेतले त्यांची नावे खालीलप्रमाणे :
- विनू मांकड (184 आणि 5/196) विरुद्ध इंग्लंड 1952
- डेनिस ऍटकिन्सन (219 आणि 5/56) विरुद्ध ऑस्ट्रेलिया 1955
- पॉली उमरीगर (172* आणि 5/107) वि. वेस्ट इंडीज 1962
- गॅरी सोबर्स (174 आणि 5/41) विरुद्ध इंग्लंड 1966
- मुश्ताक मोहम्मद (201 आणि 5/49) विरुद्ध न्यूझीलंड 1973
- रवींद्र जडेजा (175* आणि 5/41) वि. श्रीलंका 2022
महत्वाच्या बातम्या :
- IND vs SL Test : श्रीलंकेला फॉलोऑन; पहिला डाव 174 धावांवर गुंडाळला, जडेजाने घेतल्या 5 विकेट
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
