Wriddhiman Saha : रिद्धिमान साहाने धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या नावाबद्दल BCCI कडे केला खुलासा, म्हणाला...
Wriddhiman Saha : सध्या पार पडणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. ज्यामुळे काही दिवसांपूर्वी साहाने एक ट्वीटही केलं होतं.
Wriddhiman Saha : भारतीय क्रिकेटपटू रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला एका पत्रकारकडून धमकी मिळाल्याचं प्रकरण मागील काही दिवसांपासून चांगलच चर्चेत आहे. साहाच्या मते पत्रकाराची सर्व माहिती त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) दिली आहे. दरम्यान साहाने बीसीसीआयसोबत चर्चा केली असून संबधित पत्रकाराच्या नावाचा खुलासा करायचा की नाही? यावरही चर्चा झाली. दरम्यान अजूनतरी बीसीसीआयने याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण संबधित पत्रकाराचं नाव लवकरच सर्वांसमोर येईल अशी माहिती समोर येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सध्या पार पडणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रिद्धिमान साहाला टीम इंडियात स्थान मिळू शकलेलं नाही. दरम्यान संघ घोषणेनंतर काही तासांतच साहाने ट्वीटरवर एका पत्रकाराचं आणि त्याचं व्हॉट्सअप चॅटता स्क्रीनशॉट शेअर केला होता. ज्यामध्ये साहाला धमकी देण्यात आली होती. त्यात साहाने लिहिलं होतं की,'भारतीय क्रिकेटसाठी केलेल्या या कामगिरीनंतर मला एका पत्रकाराकडून अशाप्रकारची वागणूक मिळते. या तो पत्रकार म्हणतो,''तू कॉल केले नाहीस. मी कधीच तुझी मुलाखत घेणार नाही. मी या अपमानाबद्दल लक्षात ठेवेन.''
बीसीसीआयकडून समिती स्थापन
बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाबाबसाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बोर्डचे कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल आणि सर्वोच्च परिषद सदस्य प्रभातेज सिंह भाटिया यांना सामिल केलं आहे. सध्या ही समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तपास करत आहे.
हे ही वाचा -
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha