(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs New Zealand 2nd Test Live Streaming: भारत- न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कुठे, कधी आणि कसा पाहणार, घ्या जाणून
India vs New Zealand 2nd Test Live Streaming: मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
India vs New Zealand 2nd Test Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) 3 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळण्यात आलेल्या पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिका जिंकेल. यामुळं दोन्ही संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. मालिकेतील अखेरचा सामना जिंकून मालिका खिश्यात घालण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे सामना बदलण्यासाठी सक्षम आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर शुक्रवारपासून खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणार आहे. भारत-न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे.
संघ-
भारतीय संघ: मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (क), अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (डब्ल्यू), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा , श्रीकर भरत , प्रसिध कृष्ण , सूर्यकुमार यादव
न्यूझीलंड संघ: टॉम लॅथम, विल यंग, केन विल्यमसन (क), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (डब्ल्यू), रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, विल्यम सोमरविले, एजाज पटेल, मिचेल सँटनर, नील वॅगनर, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- IND vs NZ : विराटने बाह्या सरसावल्या, वानखेडे गाजवण्यासाठी सज्ज, शतकाचा दुष्काळ संपणार?
- IND vs NZ : मुंबईतील कसोटी सामन्यासाठी कोणा-कोणाला संधी? विराट कोहलीची पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती
- India Predicted Playing XI vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 'हे' खेळाडू गाजवतील मैदान, कसा असेल भारताचा संभाव्य संघ?