(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : विराटने बाह्या सरसावल्या, वानखेडे गाजवण्यासाठी सज्ज, शतकाचा दुष्काळ संपणार?
India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरु होणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष कर्णधार विराट कोहलीकडे असणार असणार आहे.
मुंबई : क्रिकट जगतातील सध्याचा अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). तब्बल 70 शतकं ठोकणारी विराटची बॅट मागील काही काळापासून मात्र थंड पडला आहे. विराटने नोव्हेंबर, 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध सर्वात शेवटचं शतक ठोकलं होतं. त्यानंतर एकही शतक विराटने ठोकलं नसल्याने त्याच्या सर्व चाहते चातक पक्षाप्रमाणे त्याच्या शतकाची वाट पाहत आहेत. त्यात आता विराट उद्यापासून (3 डिसेंबर) न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये असून या मैदानात विराटच्या काही खास आठवणी असल्याचं विराटनं सांगितलं. त्यात सर्वात शेवटचा कसोटी सामना विराट वानखेडेत खेळला असताना त्याने 235 धावांची धमाकेदार खेळीही केली होती. त्यामुळे या सामन्यातही विराट उत्तम खेळी करेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.
बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या विराटच्या एका व्हिडीओमध्येही विराट वानखेडे मैदान आणि त्याच्या तेथील आठवणींबाबत बोलत आहे. विराटने यावेळी वानखेडे मैदानात खेळायला फार आवडत असून याठिकाणी माझ्या खूप चांगल्या आठवणी असल्याचंही सांगितलं आहे. तसंच सामन्यात एक महत्त्वाची खेळी करावी लागली, तरं मी नक्कीच करेन, असं सांगताना विराटनं जणू त्याचे आक्रमक खेळी करण्याचे विचारच यावेळी स्पष्ट केले आहेत.
'या' तिघांजागी कोहलीची एन्ट्री शक्य
पहिल्य़ा कसोटीनंतर संघाची स्थिती पाहता विराटला जागा सलामीवीर मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या जागी मिळू शकते. कारण या तिघांनाही पहिल्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. याउलट सलामीचा सामना खेळणाऱ्या श्रेयसने मात्र पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं होतं. त्यामुळे पुजारा, रहाणे आणि अगरवाल यांच्यातील एकाला संघाबाहेर जावं लागणार हे निश्चित.
संबधित बातम्या :
- India Predicted Playing XI vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 'हे' खेळाडू गाजवतील मैदान, कसा असेल भारताचा संभाव्य संघ?
- IND vs NZ : मुंबईतील कसोटी सामन्यासाठी कोणा-कोणाला संधी? विराट कोहलीची पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती
- IPL 2022 Retention : मुंबईला हार्दिक, चेन्नईला रैना परवडणार का? रिटेंनशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha