IND Vs ENG 3rd Test Match: विराटला इतिहास रचण्याची संधी, धोनीचा 'हा' विक्रम मोडणार?
टीम इंडियाकडून भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबातीत मोहम्मद अजरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सौरव गांगुली चौथ्या आणि सुनील गावस्कर पाचव्या क्रमांकावर आहे.
IND Vs ENG 3rd Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून धोनीच्या नावे भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम आहे. धोनीचा विक्रम मोडणे महत्त्वाचे नसून टीम इंडियाचा विजय महत्वाचा आहे, असं विराट कोहलीने म्हटलं.
चेन्नई कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतात टीम इंडियाचा हा 21 वा विजय होता. या विजयासह विराट कोहलीने कर्णधार म्हणून धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वातही टीम इंडियाने भारतात 21 कसोटी सामने जिंकले आहेत. अहमदाबाद येथील डे नाईट कसोटी टीम इंडियाने जिंकली तर विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 22 वा विजय असेल. अशारीतीने विराट भारतात कसोटी विजयाच्या बाबतीत धोनीच्या पुढे जाईल आणि भारताचा यशस्वी कर्णधार ठरणार आहे.
टीम इंडियाकडून भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबातीत मोहम्मद अजरुद्दीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद अजरुद्दीनच्या नेतृत्वात टीम इंडियाने 13 कसोटी सामने जिंकले आहेत. तर सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने भारतात 10 कसोटी सामने जिंकले आहेत. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात भारताने सात सामने जिंकले आहेत.
मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....
भारत-इंग्लंड मालिका 1-1 ने बरोबरीत
मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 228 पराभव केला होता आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया इंग्लंडचा 317 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. मालिकेतील शेवटचे दोन्ही सामने अमहदबाद येथे खेळवले जाणार आहेत.
इशांत शर्माचा 100 वा कसोटी सामना
इशांत मोटेराच्या मैदानावर त्याच्या कसोटी कारकिर्दीचा 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. महान भारतीय अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर 100 कसोटा सामना खेळणारा इशांत हा दुसरा वेगवान गोलंदाज असेल. इशांतने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत कसोटी क्रिकेटमधील 300 विकेट्सही पूर्ण केल्या. आतापर्यंत खेळलेल्या 99 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 302 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 74 धावा देऊन 7 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. इशांतने कसोटी सामन्याच्या डावात 11 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत.