एक्स्प्लोर

मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....

स्वप्नपूर्तीच्या वाटेवर असणारा हाच विराट जीवनात एका अशा टप्प्यावरही पोहोचला होता, जिथं त्याला अतिशय एकाकी वाटत होतं.

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघातील एक असं नाव, ज्या नावाभोवती प्रसिद्धी, क्रीडारसिकांचं प्रेम या साऱ्याचं एक वेगळंच वलय तयार झालं आहे. विराट आणि त्याची क्रिकेट या खेळाप्रती असणारी आत्मियता ही  केवळ शब्दांत व्यक्त करणंही कठीण. विराट फक्त मैदानात आल्यावर क्रीडारसिकांचा होणारा कल्ला, त्याच्यावर संघाचा आणि संघ व्यवस्थापनाचा असणारा विश्वास हे सारंकाही मान्य. पण, हाच विराट जीवनात एका अशा टप्प्यावरही पोहोचला होता, जिथं त्याला अतिशय एकाकी वाटत होतं. एकटेपणाची भावना ही व्यक्तीला अंतर्मनातून कमकुवत करते. विराटसोबतही हे सारं घडलं. त्यालाही एकटेपणाचा सामना करावा लागला. खरंतर हे सारं विश्वास बसण्याजोगं नाही, पण तरीही हेच कटू सत्य आहे ज्याचा खुलासा खुद्द विराटनंच केला आहे.

IPL 2021 Auction | आयपीएल लिलाव - कोणासाठी जॅकपॉट तर कोणासाठी तारणहार, कोणत्या खेळाडूला किती बोली?

2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यादरम्यान विराट नैराश्याचा सामना करत होता. इथं त्याच्या मनात एकटेपणाच्या भावनेनं घर केलं होतं. या जगात आपण अगदीच एकटे आहोत अशीच मन हेलावणारी भावना त्याला खचवून गेली होती. इंग्लंडच्या संघातील माजी खेळाडू मार्क निकोलस याच्या ‘नॉट जस्ट क्रिकेट पॉडकास्ट’ या कार्यक्रमात विराटनं याबाबतचा खुलासा केला. फलंदाजीमध्ये आलेल्या अपयशामुळं विराटला या साऱ्याचा सामना करावा लगला होता. ‘हो, मी नैराश्याचा सामना केला’ तू केव्हा नैराश्याचा सामना केला आहेस का, असा प्रश्न विचारला असता यावर विराटनं कशाचीही तमा न बाळगता, होकारार्थी उत्तर देत म्हटलेलं, ‘हो मी नैराश्याचा सामना केला होता.’ रोज सकाळी तुम्ही धावा करण्यास सक्षम नाही, या भावनेनं जागं होणं ही अजिबातच चांगली गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वच फलंदाज याच दडपणाखाली होते की तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या नियंत्रणात नाहीत, असं म्हणत नेमकं या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं हेच तुम्हाला कळत नाही, ही बाब त्यानं अधोरेखित केली होती. हा तोच काळ होता जेव्हा विराटनं सारी हत्यारं टाकून दिली होती. आपण या जगात एकटे पडलो आहोत हीच भावना त्याला सतावत होती. मुळात जीवनात आधार देणारी मंडळी असूनही विराटला एकटं वाटत होतं. त्याला त्यावेळी क्रिकेट कारकिर्दीच्या दृष्टीनं मदत मिळणं अपेक्षित आणि आवश्यक होतं. जगातील सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या विराटनं यावेळी मानसिक स्वास्थ्य़ कितपत महत्त्वाचं आहे, हे सांगत याकडे दुर्लक्ष करणं वेळप्रसंगी भविष्यंही संकटात टाकू शकतं हा थेट इशारा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
टीव्हीसमोर एकटाच बसून पुटपुटत होता सूर्यकुमार यादव; पत्नीने गुपचूप कॅमेरा ऑन केला अन्... IND vs WI मॅचमधील स्ट्रॅटेजी ऐकून सगळेच चक्रावले, पाहा VIDEO
Shubman Gill VS Shai Hope : टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
टी-20 खेळायला नाही तरी शुभमन गिलला डिवचलं, भारत-वेस्ट इंडिजच्या कर्णधारात ड्रामा, नेमकं काय घडलं?
IND vs WI 2nd T20 : रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
Abhijeet Dipke Family : अभिजीत दिपकेंना दिल्लीत विमानातूच पोलिसांनी उचललं; दिपके कुटुंब भडकलं, आई-वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले, संसदेत डाकू बसलेत, गुंडांना लोकशाही नकोय...'
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
अमेरिकेच्या 100 वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा टीव्हीवर LIVE दाखवली जाणार; माजी लष्करी मेजर आरोपीला थेट गोळ्या घालून मृत्यूदंड देणार, प्रकरण नेमकं काय?
Abhijeet Dipke: तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
तिकडे दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना पकडलं, इकडे आजीने अखेरचा श्वास घेतला
Delhi CJP Protest: संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
संपूर्ण दिल्लीच आता जंतर मंतर, प्रत्येक पोलिस स्टेशन लोकांनी भरलं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मोर्चावर अमानुष लाठीचार्ज, अजित नवलेंनी ग्राऊंड रिपोर्ट सांगितला
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
ध्रुव राठीला घरातून उचलल्यानंतर अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दासना महिला पोलिसांनी थेट विमानात घुसून ताब्यात घेतलं, विमानतळावर शेकडो गाड्यांचा फौजफाटा, सीजेपीच्या लीगल टीम हेडला सुद्धा उचललं
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Pune Crime News: नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
नवी कोरी गाडी गोल-गोल फिरवून स्टंट; शूट अन् ड्रोन, आळंदीत रिलस्टारसह चौघांवर गुन्हा दाखल, इनोव्हाही पोलिसांनी केली जप्त, नेमकं काय घडलं?
Embed widget