एक्स्प्लोर

Ind vs Eng, Motera Test: तिसऱ्या कसोटीसाठी मोटेरा स्टेडियम दोन खेळपट्ट्यांसह सज्ज, इंग्लंड संघाचा संभ्रम कायम

चेन्नईतील दुसऱ्या कसोटीप्रमाणेच मोटेरा स्टेडियम येथेही बॉल फिरेल, खेळपट्टीवर किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे.

INDvsENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दुसर्‍या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या फलंदाजांना हे समजले असावे की फिरकीच्या सहाय्याने भारतीय खेळपट्ट्यांवर धावा करणे इतके सोपे नाही. तर भारतीय संघाला घरगुती मैदानांवरील परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. खेळपट्टीबाबत पाहुण्या संघास कोणत्याही प्रकारची तयारी करुन द्यायची नाही. यामुळेच इंग्लंडला गोंधळात ठेवण्यासाठी मोटेराच्या स्टेडियममध्ये दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीप्रमाणेच येथेही बॉल फिरेल, खेळपट्टीवर किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे.

सामन्यापूर्वी 48 तासांपूर्वी खेळपट्टी आयसीसीकडे सोपवण्यात येते

आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरली जाणारी खेळपट्टी सामन्याच्या 48 तास आधी आयसीसी मॅच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. खेळपट्टीबाबत इंग्लंड संघाचा संशय कायम ठेवावा अशी भारताची इच्छा आहे आणि खेळपट्टी आयसीसीच्या अधिकाऱ्यांकडे देण्यापूर्वी ती कशी आहे हे उघड होऊ नये ही भारतीय संघाची इच्छा आहे. यामुळे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याला इंग्लंडला प्लेईंग इलेव्हनची निवड करणे अवघड झाल्याचे सिद्ध होत आहे.

INDvsENG : सूर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण; इरफान-हरभजन म्हणतात...

दोन्ही खेळपट्ट्यांवर गवत

गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मोटेरा येथे दोन प्रकारच्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. एक खेळपट्टी काळ्या मातीचा वापर केला आहे. ज्यावर वेग आणि अतिरिक्त बाउन्स दिसेल आणि वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल. तर दुसरी खेळपट्टी लाल रंगाची बनलेली आहे. दुसर्‍या खेळपट्टीवर दुसर्‍या कसोटी प्रमाणे टर्न आणि बाऊन्स दिसेल. ही खेळपट्टी स्पीनर्सना उपयुक्त ठरेल. दोन्ही खेळपट्ट्यांवर बरंच गवत आहे, यामुळे खेळपट्टी कशी असेल सांगणे कठीण आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मोटेरा स्टेडियमही नवीन

मोटेराचे स्टेडियम नव्यानेच तयार केले आहे. आतापर्यंत येथे फक्त काही टी -20 सामने खेळले गेले आहेत. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टी 20 सामन्यात फक्त 40 षटकांचा खेळ होतो आणि त्यानुसार खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज लावणे कठीण असते.

मोठा खुलासा! यशशिखरावर असणारा विराट एकटा पडतो तेव्हा....

महत्त्वाच्या बातम्या

लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget