Ind vs Eng 2021 | चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत; 249 धावांची मोठी आघाडी
गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आपली पकड मजबूत बनवली आहे. इग्लंडचा पहिला डाव केवळ 134 धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 54 धावा केल्या.
![Ind vs Eng 2021 | चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत; 249 धावांची मोठी आघाडी India vs England Chennai Test Day 2 Stumps India Lead 2nd Innings Play Continues Rohit Sharma Pujara At Crease Ind vs Eng 2021 | चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत; 249 धावांची मोठी आघाडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/14230958/IND-vs-ENG.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs ENG 2nd Test Day 3 : गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आपली पकड मजबूत बनवली आहे. इग्लंडचा पहिला डाव केवळ 134 धावांवर आटोपल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत आपल्या दुसऱ्या डावात एक विकेट गमावत 54 धावा केल्या. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाकडे एकूण 249 धावांची आघाडी आहे.
रोहित शर्माने दुसर्या कसोटी सामन्यात 161 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावत 300 धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल पाच धावांवर नाबाद परतला. रोहित शर्माशिवाय अजिंक्य रहाणेनेही भारताकडून 67 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पहिल्या सत्रात भारताची सुरुवात खराब झाली. परंतु, चौथ्या विकेटसाठी रोहित आणि रहाणे यांच्यातील 162 धावांच्या मजबूत भागीदारीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. पहिल्या सत्रात भारताने शुभमन गिल (0), चेतेश्वर पुजारा (21) आणि कर्णधार विराट कोहली (0) असे गडी गमावले. पण यानंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव ताब्यात घेत संघाला संकटातून बाहेर काढलं.
रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या फलंदाजीत 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरीकडे रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांनी दुसर्या सत्रामध्ये भारताला कोणताही धक्का बसू दिला नाही.
आज दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 300 धावांवरुन सुरु केला. कालच्या धावसंख्येत भारताच्या उर्वरित खेळाडूंनी केवळ 29 धावांची भर घातली, ऋषभ पंत 58 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या वतीनं मोईन अलीने चार विकेट्स घेतल्या. त्या व्यतिरिक्त जॅक लीचने दोन तर ओली स्टोन आणि जो रूट यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.
इग्लंडला 134 धावांवर ऑल आउट केल्यानंतर आपला दुसरा डाव सुरुवात करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रोहित आणि शुभमन गिलने पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. गिलने एक षटकार लगावत 14 धावा केल्या. जॅक लीचने एलबीडब्ल्यू आउट करत गिलला माघारी धाडलं.
पहिल्या डावात 134 धावांवर इंग्लंडचा संघ गारद
चेन्नईच्या टर्निंग विकेटवर इंग्लंडच्या संघाने आपल्या पहिल्या डावाच केवळ 134 धावा केल्या. इंग्लंडच्या वतीनं विकेटकिपर फलंदाज बेन फोक्सने 107 चेंडूंमध्ये चार चौकार लगावत सर्वाधिक 42 धावा करुन नाबाद राहिला. याव्यतिरिक्त ओली पोपने 22, बेन स्टोक्सने 18 आणि डॉमिनिक सिब्लेने 16 धावा केल्या.
तर भारतीय गोलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केली. अश्विनने 43 धावा देत पाच विकेट्स घेतले. इशांत शर्माने 22 धावा, अक्षर पटेलने 40 धावा देत 2 विकेट्स आणि मोहम्मद सिराजने पाच धावा देत एक विकेट घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- IND vs ENG 2nd Test Day 1 Highlights: पहिला दिवस हिटमॅन रोहितने गाजवला, दिवसाअखेर भारत सहा बाद 300 धावा
- रोहितच्या शानदार शतकावर दिग्गज खेळाडू फिदा, इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो...
- IND vs ENG 2nd Test Day 2 Highlights: भारताचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला, ऋषभ पंत 58 धावांवर नाबाद
- Ind Vs Eng 2021 | दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया मजबूत स्थितीत, एकूण 249 धावांची आघाडी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)