एक्स्प्लोर

IND vs ENG 2nd Test Day 1 Highlights: पहिला दिवस हिटमॅन रोहितने गाजवला, दिवसाअखेर भारत सहा बाद 300 धावा

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने सहा गडी राखून 300 धावा केल्या आहेत.

IND vs ENG 2nd Test Day 1: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्माने गाजवला. रोहित शर्माने दुसर्‍या कसोटी सामन्यात 161 धावांचा शानदार डाव खेळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावत 300 धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत 33 आणि डेब्यू मॅन पाच धावांवर नाबाद परतला. रोहित शर्माशिवाय अजिंक्य रहाणेनेही भारताकडून 67 धावा केल्या. त्याचवेळी इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहिल्या सत्रात भारताची सुरुवात खराब झाली. परंतु, चौथ्या विकेटसाठी रोहित आणि रहाणे यांच्यातील 162 धावांच्या मजबूत भागीदारीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. पहिल्या सत्रात भारताने शुभमन गिल (0), चेतेश्वर पुजारा (21) आणि कर्णधार विराट कोहली (0) असे गडी गमावले. पण यानंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव ताब्यात घेत संघाला संकटातून बाहेर काढलं.

रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या फलंदाजीत 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरीकडे रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांनी दुसर्‍या सत्रामध्ये भारताला कोणताही धक्का बसू दिला नाही.

तिसर्‍या सत्रात जॅक लीचच्या चेंडूवर स्वीप मारणाच्या नादात रोहित झेलबाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात मोईन अलीने रहाणेला बाद केले आणि भारताला पाचवा धक्का दिला.

भारतीय संघाने 249 धावांत पाच बळी गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि आर अश्विन यांनी चांगली खेळी करायला सुरुवात केली. पण जो रूटने अश्विनला (13) 284 धावसंख्या असताना तंबूचा रस्ता दाखवला.

पहिल्याच दिवशी फिरकीपटूंचा चेंडू बराच टर्न घेत होता. शेवटच्या सत्रामध्ये लीच आणि मोईन आणखी घातक गोलंदाजी करत होते. पण पंतने आपला नैसर्गिक खेळ केला आणि दोन्ही फिरकीपटूंवर शॉट्स लगावले. त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची नाबाद खेळी केली.

मोईन अली इंग्लंडसाठी खूप महाग ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याने 26 षटकांत 112 धावा दिल्या. यात त्याने दोन विकेट मिळविण्यात यश मिळविले. त्यामानाने जॅक लीचने गोलंदाजीवर बरेच नियंत्रण ठेवले. त्याने 26 षटकांत केवळ 78 धावा देऊन दोन बळी घेतले. या व्यतिरिक्त, ओली स्टोन आणि जो रूट यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-3 : भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
भारताचा अफगाणिस्तानवर मोठा विजय; डेब्यू टेस्टमध्ये मानव सुथारची फिरकीची जादू, तिसऱ्या दिवशी काय घडलं?
Mumbai Indians IPL 2026 : IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
IPLच्या इतिहासातील सगळ्यात मोठी डील होणार; हार्दिक, सूर्यकुमार मुंबई इंडियन्स सोडणार, कर्णधारही ठरला, नेमकं काय काय घडतंय?
Shreyas Iyer News : टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
टीम इंडियात मोठं पद मिळालं, पण अय्यरने स्वतःला बदलण्यास दिला नकार; कर्णधारपदाचा भार खांद्यावर घेताना श्रेयस बोल बोल बोलला; सगळेच चक्रावले
WTC Points Table : एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?
एक पराभव अन् न्यूझीलंडचा झाला गेम, WTCरेसमध्ये नवा ट्विस्ट; दक्षिण आफ्रिकेची झेप, Points Tableमध्ये भारत कुठे अन् टॉपवर कोण?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
पश्चिम बंगालमधील 15 वर्षांची सत्ता जाताच 58 आमदारांनंतर 20 खासदारांची सुद्धा 'ममता' आटली; दीदींची साथ सोडत भाजपला पाठिंबा, देशात आणखी एका प्रादेशिक पक्षाचे गल्ली ते दिल्ली दोन तुकडे
India vs Afghanistan: भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
भारताने अफगाणिस्तानचा एक डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवला, पण तरीही WTC गुणतालिकेत एक गुण सुद्धा का मिळाला नाही?
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबड तहसीलदार लाच प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदार सुयोग सोळुंकेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय तोच मला; छगन भुजबळांच्या वक्तव्यावर सुनील तटकरेंचा पलटवार, काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष?
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
Embed widget