एक्स्प्लोर

रोहितच्या शानदार शतकावर दिग्गज खेळाडू फिदा, इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो...

IND vs ENG 2nd Test : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्माने गाजवला. रोहितच्या शानदार शतकावर दिग्गज खेळाडू फिदा झाले आहेत.

IND vs ENG 2nd Test : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्माने गाजवला. रोहितच्या शानदार शतकावर दिग्गज खेळाडू फिदा झाले आहेत. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं रोहित शर्माच्या शतकाला मॅच विनिंग खेळी म्हटलंय. त्यानं म्हटलं आहे की, रोहितनं शानदार शतक केलं. त्याला खेळताना पाहणं सुखद असतं.

टीम इंडियाचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणनं म्हटलं आहे की, रोहितनं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे. अशा आव्हानात्मक स्थितीत हे खूप शानदार शतक आहे. हरभजन सिंहनं म्हटलं आहे की, रोहितची ही जबरदस्त खेळी आहे. तर सुरेश रैनानं देखील रोहितचं कौतुक केलं आहे, त्यानं म्हटलं आहे की, माझा भाऊ रोहितची आणखी एक शानदार खेळी. तो नेहमीच मैदानावर आपली छाप सोडतो.

रोहित शर्माने दुसर्‍या कसोटी सामन्यात 161 धावांची शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने सहा गडी गमावत 300 धावा केल्या आहेत. मैदानावर ऋषभ पंत 33 आणि अक्षर पटेल पाच धावांवर नाबाद परतला. रोहित शर्माशिवाय अजिंक्य रहाणेनेही भारताकडून 67 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहिल्या सत्रात भारताची सुरुवात खराब झाली. परंतु, चौथ्या विकेटसाठी रोहित आणि रहाणे यांच्यातील 162 धावांच्या मजबूत भागीदारीमुळे टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. पहिल्या सत्रात भारताने शुभमन गिल (0), चेतेश्वर पुजारा (21) आणि कर्णधार विराट कोहली (0) असे गडी गमावले. पण यानंतर रोहित आणि रहाणेने भारताचा डाव ताब्यात घेत संघाला संकटातून बाहेर काढलं.

रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या फलंदाजीत 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरीकडे रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांनी दुसर्‍या सत्रामध्ये भारताला कोणताही धक्का बसू दिला नाही.तिसर्‍या सत्रात जॅक लीचच्या चेंडूवर स्वीप मारणाच्या नादात रोहित झेलबाद झाला. त्यानंतर थोड्याच वेळात मोईन अलीने रहाणेला बाद केले आणि भारताला पाचवा धक्का दिला. भारतीय संघाने 249 धावांत पाच बळी गमावल्यानंतर ऋषभ पंत आणि आर अश्विन यांनी चांगली खेळी करायला सुरुवात केली. पण जो रूटने अश्विनला (13) 284 धावसंख्या असताना तंबूचा रस्ता दाखवला.

पहिल्याच दिवशी फिरकीपटूंचा चेंडू बराच टर्न घेत होता. शेवटच्या सत्रामध्ये लीच आणि मोईन आणखी घातक गोलंदाजी करत होते. पण पंतने आपला नैसर्गिक खेळ केला आणि दोन्ही फिरकीपटूंवर शॉट्स लगावले. त्याने 56 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 33 धावांची नाबाद खेळी केली.

मोईन अली इंग्लंडसाठी खूप महाग ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याने 26 षटकांत 112 धावा दिल्या. यात त्याने दोन विकेट मिळविण्यात यश मिळविले. त्यामानाने जॅक लीचने गोलंदाजीवर बरेच नियंत्रण ठेवले. त्याने 26 षटकांत केवळ 78 धावा देऊन दोन बळी घेतले. या व्यतिरिक्त, ओली स्टोन आणि जो रूट यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL U19 3rd Youth ODI : टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
टीम इंडियाने आणखी एक मालिका गमावली! निर्णायक सामन्यात द्रविडच्या मुलाला डच्चू, श्रीलंकेने 1 विकेट राखून जिंकला सामना
IND vs ENG ODI : इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अन् पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड धोक्यात
इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अन् पाकिस्तानी खेळाडूचा रेकॉर्ड धोक्यात
पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
पाकिस्तानचा कर्णधारपदाचा ट्रेंड भारतात उपकर्णधारासाठी लागू! कपड्यांसारखे खेळाडू बदलणारा नवा पॅटर्न, पुढचा नंबर 'या' खेळाडूचा?
Team India Squad : IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?
IPL 2026 मध्ये शून्य विकेट... तरीही टीम इंडियात थेट एन्ट्री! सिलेक्टर्सच्या 'या' निर्णयाने सगळेच अवाक्, नेमका कोण हा खेळाडू?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget